शोध स्वतःचा : ‘लाँग कोविड’ आणि उपाययोजना

मागील सव्वा वर्षांपासून कोरोना हा विषय सर्वव्यापी होऊन राहिला आहे. कोरोना या विषयाच्या अनुषंगाने खूप बोललं, लिहिलं जात आहे.
Devyani M
Devyani MSakal

मागील सव्वा वर्षांपासून कोरोना हा विषय सर्वव्यापी होऊन राहिला आहे. कोरोना या विषयाच्या अनुषंगाने खूप बोललं, लिहिलं जात आहे. रुग्णांची आकडेवारी, प्रतिकारशक्तीचे शास्त्र, सावधगिरी बाळगण्याचे सल्ले, हॉस्पिटल-बेडची कमतरता इत्यादी. मी ८ जूनला ‘रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन’ या विषयावर लेख लिहिला होता. त्यात आजारातून रिकव्हर होणे इतपतच आपला उद्देश ठेवून चालणार नाही, तर रिहॅबिलिटेशन म्हणजे आयुष्य आणि आरोग्य हे पूर्वस्थितीत आणण्याला किती महत्त्व आहे हे लिहिलं होतं. आजाराचा, त्यावर घेतलेल्या औषधांचा दुष्परिणाम, विविध आंतर इंद्रियांवर त्यानं आलेला ताण व कमी झालेली त्यांची कार्यक्षमता हे ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून बरं होण्यामध्ये आतील यंत्रणेचं पुनर्वसन हा घटक विसरता कामा नये.

त्याच विषयाला मी आज पुढं घेऊन जाणार आहे. कोरोनामधून बाहेर येऊनही आपण पूर्ण बरे झाले आहोत, असं अनेकांना वाटत नाहीये. त्याचं कारण आहे कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावरही त्याची काही शारीरिक व मानसिक लक्षणे रेंगाळत राहतात. ही लक्षणं काहींमध्ये सौम्य प्रमाणात आहेत, काहींमध्ये मध्यम तर काहींमध्ये गंभीर. ही लक्षणे घेऊन आपण आपलं काम आणि पूर्वीचं आयुष्य पुन्हा सुरू करतो. मात्र, शरीर व मन अक्षरश: ओढत राहतो. ही रेंगाळणारी लक्षणे कोणती ते पाहू

  • श्वसनाची अस्वस्थता

  • थकवा

  • थोड्याशा श्रमामुळे धाप लागणे

  • अशक्तपणा

  • दिवसा झोप येणे

  • भीती

  • चिंता

  • छातीत धडधड

  • निद्रानाश

  • वजन कमी होणे

  • स्नायू कमकुवत होणे

  • आत्मविश्वास कमी होणे

  • ब्रेन फॉग

  • एकाग्रतेचा अभाव

  • नैराश्य

  • एकूणच ताण

ही लक्षणे काही लोकांमध्ये दोन ते चार आठवडे टिकतात, तर काहींमध्ये अनेक महिने. याला ''लॉंग कोविड'' किंवा ''लॉंग हॉल कोविड'' (long haul covid) म्हणतात.

पोस्ट कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम

या रिहॅबिलिटेशनच्या फेजमध्ये खरंतर औषधांचा फार सहभाग नसतो. या काळात शरीराला ट्रेनिंगची गरज असते, कारण आपलं शरीर आतूनच बरे होण्याची क्षमता ठेवते. योगासनं आणि प्राणायाम यांच्या साहाय्यानं फुफ्फुसांचं, श्वसन संस्थेचं व संपूर्ण शरीराचं रिट्रेनिंग करणं आवश्यक आहे. हाच उद्देश ठेवून माझी संस्था ‘योग ऊर्जा’ आणि ‘सकाळ’ एकत्र येऊन पद्धतशीरपणे पूर्ण नियोजन करून दोन महिन्यांचा ‘पोस्ट कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम’ (Post COVID Recovery Program) घेऊन येत आहोत. यामध्ये योगतज्ज्ञ तुमच्या लॉंग कोविडच्या लक्षणांमधून योगाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने बाहेर यायला मदत करणार आहेत. या योग सत्राचे रजिस्ट्रेशन याच आठवड्यात सुरू होत आहे.

पुढील महिन्यापासून ऑनलाइन स्वरूपात दोन महिन्यांचे हे ट्रेनिंग होणार आहे, त्यामुळं तुम्ही कुठूनही यात सहभागी होऊ शकता. याची सर्व माहिती ‘सकाळ’च्या मुद्रित व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तुमची सर्व वैद्यकीय व कोविड संबंधीची माहिती आधी घेतली जाईल आणि त्यानुसार सौम्य, मध्यम व गंभीर अशा तीन तीव्रतेच्या पातळीनुसार वर्गीकरण करून त्याप्रमाणे योग सत्राचे नियोजन केले जाणार आहे. आपण सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com