शोध स्वतःचा : पोश्चरकडे लक्ष द्या!

योग्य पोश्चर आपल्या पाठीच्या कण्यावर अवलंबून असतं. त्यामुळे सर्वप्रथम पाठीचा कणा हा उत्तम स्थितीत ठेवावा, म्हणजे त्याच्या नैसर्गिक वक्रतेत ठेवावा.
Posture
PostureSakal

तुमचं प्रोफेशन कोणतेही असो, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा घरी नुसते टीव्ही बघत आराम करत असाल, फोनवर आहात किंवा किचनमध्ये काम करताय, पुस्तक वाचताय किंवा गाडी चालवताय, काहीही करत असलात किंवा काहीही करत नसलात, तरी एका गोष्टीकडं सतत लक्ष हवं - ते म्हणजे पोश्चर! आपण आपलं शरीर कोणत्या स्थितीत धरून ठेवतो त्या स्थितीची आपल्याला सवय होते आणि या सवयीनं घडलेली शरीराची ठेवण याला म्हणतात पोश्चर. पोश्चर आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य पोश्चरचे चांगलं दिसण्यापलीकडं अनेक फायदे आहेत. वेदना, दुखापत व इतर आरोग्याच्या समस्या टाळायच्या असतील, तर पोश्चरकडं बारकाईनं लक्ष द्या.

योग्य पोश्चर आपल्या पाठीच्या कण्यावर अवलंबून असतं. त्यामुळे सर्वप्रथम पाठीचा कणा हा उत्तम स्थितीत ठेवावा, म्हणजे त्याच्या नैसर्गिक वक्रतेत ठेवावा. आपला पाठीचा कणा निसर्गतः तीन ठिकाणी वळण घेतो. मान, पाठीचा मध्यभाग आणि पाठीचा खालचा भाग. पाठीचा कणा या तिन्ही ठिकाणच्या नैसर्गिक वक्रतेपेक्षा जास्त किंवा कमी वक्र नसावा. एका जागी स्थिर असताना (static posture) आणि हालचाल करत असताना (dynamic posture) या दोन्ही अवस्थांमध्ये पोश्चर कसे राहते, हे महत्त्वाचे आहे.

चुकीच्या पोश्चरचे परिणाम

  • शरीराचा समतोल बिघडतो, पाठीत पोक आल्याने माकड हाडाचा समतोल बिघडतो.

  • स्नायू व हाडांचे अनारोग्य, सांधेदुखी.

  • श्वसनाचे आजार, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे.

  • पचनाचे विकार, थकवा, पाठ, मान, खांदे, पाय आखडणे.

  • दुखापत होण्याची शक्यता वाढणे, पाठीच्या कण्याचा ऱ्हास.

पोश्चर कसे सुधारावे?

  • कोणतेही काम करताना (बसलेल्या किंवा उभ्या स्थितीत) पाठ-मान ताठ ठेवा, खांदे किंचित मागे ओढून घ्या.

  • व्यायाम व सर्व प्रकारची योगासने करा.

  • वजन नियंत्रणात ठेवा, पोट कमी करा.

  • उंच टाचांचे शूज घालणे टाळा.

  • बैठे काम करत असल्यास टेबल-खुर्ची यांच्यात योग्य उंची व अंतर ठेवा.

  • एका जागी खूप वेळ बसू नका.

  • दर दोन ते तीन तासांनी संपूर्ण शरीर छान स्ट्रेच करा

  • मांडी घालून बसा.

  • खुर्चीतही मांडी घाला किंवा एक पाय वर घेऊन बसा.

  • खुर्चीत बसल्यावर पाय जमिनीला टेकलेले असावेत.

  • खुर्चीत बसताना मांड्या व पृष्ठभाग जमिनीला समांतर असावा

  • पाठीचा खालचा भाग खुर्चीला टेकलेला असावा व तशीच संपूर्ण पाठ टेकवून आरामदायक स्थितीत सरळ ठेवा. जेणेकरून संपूर्ण पाठ सुस्थितीत व सरळ असेल

  • झोपताना खूप उंच उशी नको.

  • मान व पाठीच्या आरोग्यासाठी ब्रह्म मुद्रा व पर्वतासन सर्वोत्तम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com