शोध स्वतःचा : Be Bold

Self-confidence
Self-confidence

बाहेरच्या विश्‍वाप्रमाणंच आपल्यापैकी प्रत्येकाचं आतलं असं एक वेगळं विश्व असतं. जितकं मोठं आणि विविध गोष्टींनी भरलेलं क्लिष्ट बाह्य जग, तितकंच गुंतागुंतीचं आपलं आंतरिक जग. कितीही जवळची माणसं आपल्या आजूबाजूला असली, तरी आपल्या आतल्या जगातील काही विचार व भावना बऱ्याचदा व्यक्तच होत नाहीत. हिमनगासारखं एक दशांश वर व उरलेलं समुद्राच्या पाण्याच्या आत. त्यापैकी एक ज्यातून कधी ना कधी सर्वांनाच जावं लागतं ते म्हणजे ‘अडकल्यासारखं वाटणं’ - Feeling Stuck! चालत राहताना रस्ता संपतो किंवा नक्की वळण कोणतं घ्यायचं हे कळत नाही, असे प्रसंग येतात. व्यवसाय, नोकरी, आकांक्षा, वैयक्तिक ध्येय किंवा अगदी स्वतःच्या अशा प्रायव्हेट आयुष्यामध्ये वेळोवेळी ‘आता पुढं काय,’ असं वाटतं. असे विचार व टप्पे येणं नैसर्गिक आहे, किंबहुना ते आलेच पाहिजेत. नाहीतर सिंहावलोकन करण्याचा योग कसा येणार? त्यामुळं अशी वेळ आल्यास कमीपणा वाटून न घेता त्यात संधी शोधा!

वेळोवेळी बदल आवश्‍यक 
करिअरमध्ये, नात्यांमध्ये किंवा व्यक्तिमत्त्वात वेळोवेळी बदल होत असतात किंवा बदल व्हावेत अशी गरज भासू लागते. हे बदल अत्यंत आवश्यक असतात. आयुष्यात नावीन्य, चैतन्य, आनंद निर्माण व्हावा. चालतंय म्हणून चालू न देता एक पॉज घेऊन पाहा, जे करताय त्यानं मनाला आनंद, बुद्धीला आव्हान आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होत आहे का? होत असेल तर शाब्बास, नाहीतर काही तरी बदल होण्याची गरज आहे, हे प्रथम स्वतःला सांगा. हा बदल कोणता असावा आणि तो कसा करावा हे तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं तर तुम्हाला आतून उत्तर येईलच. ज्या अर्थी अडकल्यासारखं वाटू लागतंय तीच खरंतर बदलाची चाहूल समजावी, फक्त ती अव्यक्त स्वरूपात असते. आपल्याकडं इच्छा, वैचारिक साथ, कल्पना, संसाधनं यांचा तुटवडा नसतो किंवा असेल तर त्यातून मार्ग काढण्याची क्षमता असते. पण, असते धैर्याची! आपल्यात धीटपणा कमी पडतो. इंग्रजीत एक म्हण आहे ''luck favors the bold''.

गरज आत्मविश्‍वासाची..
तुमच्या आवडीचा जॉब किंवा व्यवसायाची संधी मिळत असेल, पण फक्त तुमचा स्वतःवरचा विश्‍वास कमी पडत असल्यास पाय खेचणाऱ्या तुमच्या मनाला युक्तीनं जिंका. संधीला अगोदर हो म्हणा आणि नंतर ते कसं पार पाडायचं याचा शोध घ्या. नुसता विचार करत बसलात, तर संधी हातातून निघून जाईल आणि ''थ्री इडियट्स''मध्ये रँचो म्हणतो तसं ‘लेटर हाथ में था, टॅक्सी गेट पर थी, जरा सी हिम्मत कर लेता तो जिंदगी कुछ और हो सकती थी!’

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फक्त आत्मविश्वासाच्या बळावर तुमच्या आजूबाजूला कित्येक जण पुढे गेलेले दिसतील. बोल्ड असण्याचे फायदे फक्त करिअरमध्ये नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मिळतात. बोल्डनेसची प्रॅक्टिस जरूर करावी लागते. धैर्य एकदा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनला की सुपरपॉवर मिळाल्यासारखं वाटू लागेल. तुम्हाला अशा गोष्टी दिसू लागतील ज्या सर्वसामान्यपणे नजरेआड होतात, नवीन स्फूर्तीने दिवसाकडे पाहाल, आणखी आनंदात जगाल. अनेकदा लोक तक्रार करतात, की त्यांच्यात पोटेन्शिअल असून त्याला वाव मिळत नाही. मी म्हणेन जराशी हिम्मत दाखवा, जरा आत्मविश्वास ठेवा, जरा धैर्य दाखवा, जरा बोल्ड होऊन पाहा, तुमच्या क्षमतेनुसार संधी तुमच्या समोर येऊन तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहील!
(लेखिका योगऊर्जा या संस्थेच्या संस्थापिका आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com