esakal | कोरोना आणि फ्लू यांच्यात काय आहे फरक... जाणून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

difference between corona and flu

जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेना कुठे फ्लूची साथ असते, पण सध्या तरी कोरोनाने साऱ्या जगाला वेठीला धरले आहे.

कोरोना आणि फ्लू यांच्यात काय आहे फरक... जाणून घ्या...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना आणि फ्लू या आजारांची लक्षणे सारखी असली तरी कोरोना फ्लूपेक्षा अधिक (दहा पट) जीवघेणा आजार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. लॉकडाउनने निम्मे जग घरात बसले आहे. काय फरक आहे, या दोन आजारांमध्ये पाहूया...


तुलना...

  • संसर्ग झाल्यानंतर किती दिवसांत आजाराची लक्षणे दिसू लागतात (इन्क्युबेशन टाईम)

फ्लू - १ ते ४ दिवस

कोरोना - २ ते १४ दिवस

  • एक बाधित व्यक्ती कितीजणांना बाधित करू शकते.

फ्लू - १ ते १.३

कोरोना - २ ते २.५

  • प्रसार होण्याचे माध्यम

फ्लू - खोकला आणि शिंकणे

कोरोना - खोकला आणि शिंकणे

  • आजाराची सुरवात केव्हा होते

फ्लू - अचानक जाणवू लागतो

कोरोना - आजार लक्षात यायला वेळ लागतो

आजाराची लक्षणे

फ्लू - ताप, सर्दी, खोकला, स्नायू दुखणे, अशक्तपणा तर विशेषतः मुलांमध्ये उलटी आणि डायरिया (हगवण)

कोरोना - बहुतांश रुग्णांमध्ये आजाराचे लक्षणे दिसतातच असे नाही किंवा ठराविकच लक्षणे दिसतात, असेही नाही. त्यातल्या त्यात, ताप, खोकला, अशक्तपणा, श्वास घेताना त्रास होणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. याशिवाय, काहींमध्ये अंगदुखी, नाक चोंदणे आणि डायरिया ही लक्षणे दिसतात.

  • रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण

फ्लू - १-२ टक्के

कोरोना - १०-२० टक्के

  • आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण

फ्लू - ०.१ ते ०.२ टक्के. दोन लाख ९१ हजार ते सहा लाख ४६ हजार जगभरात आणि अमेरिकेत १२ हजार ते ६१ हजार मृत्यू दरवर्षी होतात.

कोरोना - अमेरिकेत १.५ टक्के आणि जगात ४.४ टक्के. एक लाख १४ हजार ९८३ मृत्यू जगभरात आणि अमेरिकेत २२ हजार १०९ मृ्त्यू (१३ एप्रिल २०२० पर्यंतची आकडेवारी)

  • आजाराचा सर्वाधिक धोका कोणाला

फ्लू - पाच वयाखालील मुले आणि फुफ्फुसाचे आजार, नियंत्रणाबाहेरील मधुमेह, ह्दयाचे आजार, आवाक्याबाहेरील संसर्ग अशा व्यक्तींना अधिक धोका.

कोरोना - ज्येष्ठ नागरिक, संपर्कात येणारे वैद्यकीय कर्मचारी, डाँक्टर आणि फुफ्फुसाचे आजार, नियंत्रणाबाहेरील मधुमेह, ह्दयाचे आजार असलेल्या व्यक्ती.

  • उपलब्ध उपचार आणि लस

फ्लू - दोन्हीही उपलब्ध आहे

कोरोना - दोन्हीही उपलब्ध नाही.

  • बाधा झालेले लोक

फ्लू - दरवर्षी जगात एक अब्ज लोकांना बाधा होते, एकट्या अमेरिकेत हेच प्रमाण वर्षाकाठी ९३ लाख ते साडेचार कोटी एवढे आहे.

कोरोना - जगात १८ लाख ६० हजार ०११ केसेस आणि अमेरिकेत पाच लाख ५७ हजार ५९० केसेस सापडल्यात. (१३ एप्रिल २०२० पर्यंतची आकडेवारी)

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)