तुम्हाला डायबेटिस आणि डायलिसिस यामधील संबंध माहिती आहे का ?

प्राजक्ता निपसे
Tuesday, 28 July 2020

डायबेटिस कंट्रोलमध्ये  ठेवला नाही, तर त्यामुळे सीकेडीशिवाय इतरही समस्याही निर्माण होऊ शकतात. उदा: डोळ्यांचे विकार, हृदयविकार, उच्च रक्तदाब, पायांचे आजार आदी. डायबेटिसमुळे होणारा मूत्रपिंडाचा विकार असेल, तर या तिंघावर  नियंत्रण ठेवणे आणि डायबेटिस व मूत्रपिंडे दोन्हींची काळजी घेणे गरजेचे  आहे. हे केल्यास निरोगी आयुष्य जगले जाऊ शकते.

मूत्रपिंडाच्या अवघड आजारांपैकी काही टक्के विकारांना मधुमेह जबाबदार असतो आणि मूत्रपिंडाच्या अवघड आजारांमागील प्रमुख कारणांमध्येही डायबेटिसचा समावेश होतो. शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन निर्माण करू शकत नाही किंवा इन्सुलिन कार्यक्षमतेने वापरू शकत नाही, अशी स्थिती  म्हणजे डायबेटिस होय. त्यामुळे निरोगातील साखरेची (ग्लुकोज) पातळी योग्य राखणे कठीण होऊन जाते.

डायबेटिस कंट्रोलमध्ये  ठेवला नाही, तर त्यामुळे सीकेडीशिवाय इतरही समस्याही निर्माण होऊ शकतात. उदा: डोळ्यांचे विकार, हृदयविकार, उच्च रक्तदाब, पायांचे आजार आदी. डायबेटिसमुळे होणारा मूत्रपिंडाचा विकार असेल, तर या तिंघावर नियंत्रण ठेवणे आणि डायबेटिस व मूत्रपिंडे दोन्हींची काळजी घेणे गरजेचे आहे. हे केल्यास निरोगी आयुष्य जगले जाऊ शकते.

डायबेटिसचा मूत्रपिंडावर कसा होतो परिणाम  ?
डायबेटिसच्या साइड इफेक्ट्समुळे मूत्रपिंडांतील रक्तवाहिन्यांची हानी होते व त्या कमजोर होतात. नुकसानग्रस्त रक्तवाहिन्यांमुळे मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित  होऊ शकत नाही, तसेच मूत्रपिंडांनी रक्तातील विषारी द्रव्ये तसेच टाकाऊ पदार्थ ज्या पद्धतीने वेगळे करणे आवश्यक असते, त्याप्रमाणे ते होऊ शकत नाही. मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित झाले नाही, तर परिणाम म्हणून मूत्रपिंडांच्या आजारात  होते आणि शेवटी  मूत्रपिंडांचे कार्य बंद पडू शकते. डायबेटिसच्या रुग्णांना हाय बीपीचा त्रासही होऊ लागतो आणि हाय बीपी हेही सीकेडीमागील प्रमुख कारणांपैकी आहे.

डायबेटिसमुळे शरीरातील नसांचेही नुकसान होते आणि त्यामुळे ब्लॅडर नीट रिकामे होत नाही. जड झालेले मूत्राशय आणि त्यामुळे येणा-या दाबामुळे मूत्रपिंडांना जखमा होऊ शकतात. मूत्राशयात मूत्र दीर्घकाळ साचून राहिले, तर शुगरची पातळी जास्त असलेल्या त्या मूत्रात जीवाणूंची वाढ होऊन इन्फेक्शन होऊ शकतो.

डायबेटिसच्या पेशंटमधील मूत्रपिंडाच्या विकाराची लक्षणे पुढीप्रमाणे :
१  हाय बीपी
२  सतत लघवीला जावे लागणे
३  थकवा येणे
४ अशक्तपणा व फिकेपणा
५ लघवीमध्ये केटोनीज/प्रथिनांचे अस्तित्व
६  वारंवार तहान लागणे
७  सकाळी मळमळ होऊन उलटय़ा होणे 
८  अचानक वजन कमी होणे

डायलिसिस व डायबेटिस समजून घेणे :
डायबेटिसमुळे होणा-या मूत्रपिंड आजारावर उपचार म्हणून कोणत्या प्रकारचे डायलिसिस घेतले जाते, यावर उपचारांचे मधुमेहावर काय थेट परिणाम होतील हेहि अवलंबून आहे.

पेरिटोनिअल डायलिसिस आणि डायबेटिस :
पेरिटोनिअल डायलिसिस (पीडी) घेत असल्यास, रक्तातील शुगरच्या पातळीवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. कारण, या प्रकारच्या डायलिसिससाठी वापरल्या जाणा-या डायलिसेटमध्ये डेक्स्ट्रोज नावाचा घटक असतो. रुग्णाच्या पीडी सोल्युशनमधील डेक्स्ट्रोज रक्तातील एक्सट्रा द्रवपदार्थ काढून टाकण्यात मदत करते, पण त्यामुळे रक्तातील शुगरची पातळीही वाढवते. त्यात विविध स्ट्रेंग्थ्सच्या डायलिसेटमध्ये डेक्स्ट्रोजचे प्रमाण वेगवेगळे असते. पेरिटोनिअल डायलिसिस घेणा-या मधुमेहाच्या रुग्णांचा इन्सुलिनचा डोस कधी कधी वाढवावा लागतो.

हेही वाचा : अँटीबॉडी म्हणजे काय ? जाणून घ्या याबद्दल

हेमोडायलिसिस आणि डायबेटिस :
डायलिसिस उपचारांचा रक्तातील शुगरच्या पातळीवर काहीही परिणाम होणार नाही. हेमोडायलिसिस उपचारांदरम्यान रुग्णाला रक्तातील शुगरच्या पातळीत चढ-उतार होत असतील, तर ते होणारच ,कारण रुटीन बदलला जातो. पेशंटला आहाराबद्दल किंवा डायबेटिस नियंत्रणात राखण्याबद्दल काही शंका असतील, तर तुम्ही डॉक्टरांकडून त्यांचे निरसन करून घेणे फायदेशीर ठरेल.

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the difference between diabetes and dialysis