
ऑक्सिजन सिलेंडर व ऑक्सिजन कंसंट्रेटरमधील फरक माहित आहे का?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (second wave of Covid-19) परिणाम कमी -अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्तीवर झाला आहे. आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली असून बऱ्याच जणांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या रुग्णालये किंवा घरी आयसोलेट झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर (oxygen cylinder) किंवा ऑक्सिजन कंसंट्रेटरची (oxygen concentrator) मदत घ्यावी लागत आहे. त्यातच ऑक्सिजन सिलेंडर (oxygen cylinder) व कंसंट्रेटरची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याचादेखील तुडवडा जाणवू लागला आहे. परंतु, ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजन कंसंट्रेटरमधील फरक काय किंवा या दोन्हींचा वापर नेमका कधी करावा हे तुम्हाला माहित आहे का? (Difference between oxygen cylinder and oxygen concentrator) म्हणूनच 'tribecacare'च्या वृत्तानुसार, या दोघांमधील नेमका फरक काय ते जाणून घेऊयात.
ऑक्सिजन सिलेंडर (oxygen cylinder) म्हणजे काय?
खरं तर ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे नेमकं काय हे साऱ्यांनाच ठावूक आहे. ज्या रुग्णामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते अशा रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने कृत्रिम ऑक्सिजन पुरवला जातो, ज्यामुळे त्याचे प्राण वाचू शकतात. एका सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरला जातो व त्याच्या माध्यमातून रुग्णाला ऑक्सिजन दिला जातो. परंतु, या सिलेंडरला कोणत्याही प्रकारचा ऑक्सिजन मास्क किंवा नेसल ट्यूब जोडता येत नाही. त्यामुळे त्याची स्वतंत्रच खरेदी करावी लागते. तसंच या सिलेंडरला व्हिल्स किंवा स्टँण्ड नसल्यामुळे त्याची वाहतूक करणंही त्रासदायक ठरतं.
हेही वाचा: पाळीव श्वानाला कुत्रा म्हटल्यामुळे दोन जणात तुंबळ हाणामारी
ऑक्सिजन कंसंट्रेटर (oxygen concentrator) म्हणजे काय?
ऑक्सिजन कंसंट्रेटर हे एक पोर्टेबल ऑप्शन आहे. हे कंसंट्रेटर एका जागेवरुन दुसरीकडे नेणं अत्यंत सोपं आहे. हे एक मेडिकल डिव्हॉइस असून त्यात ऑक्सिजन मास्क नेसल ट्यूब आणि अन्य आवश्यक वस्तू जोडलेल्या असतात. कंसंट्रेटर विजेवर चालणार यंत्र असल्यामुळे ते २४ तास काम करतं. परंतु, यातून एका मिनिटात केवळ ५ ते १० लीटरच ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो. ऑक्सिजन कंसंट्रेटरचे दोन प्रकार आहेत. पहिला कंटिन्यूअस पल्स आणि दुसरा फ्लो कंसंट्रेटर. यामध्ये फ्लो कंसंट्रेटर एकदा चालू केल्यानंतर जोपर्यंत आपण तो बंद करत नाही तोपर्यंत तो सुरु राहतो. तर, पल्स कंसंट्रेटर रुग्णाच्या ब्रिदींग पॅटर्ननुसार काम करतो. म्हणजे जर रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ लागला तर हे कंसंट्रेटर काम सुरु करतं.
ऑक्सिजन कंसंट्रेटर नेमकं कशाप्रकारे काम करतं?
ऑक्सिजन कंसंट्रेटरमध्ये कृत्रिम गॅस भरण्यात येत नाही. तर, वातावरणातील ऑक्सिजन यात साठवला जातो. वातावरणात ७८ टक्के नायट्रोजन आणि २१ टक्के ऑक्सिजन असतो. तर अन्य वायूंचं प्रमाण १ टक्का असतो. यामध्ये वातावरणातील ऑक्सिजन कंसंट्रेटरमध्ये फिल्टर करुन साठवला जातो. हवेतील या कंसंट्रेटरमधून रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी एक रेग्युलेटर बसवण्यात आलं असून त्यावर प्रेशर वॉल्वदेखील आहे.
Web Title: Difference Between Oxygen Cylinder And Oxygen
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..