अंगांना मुंग्या येत असल्यास नका करू दुर्लक्ष! ५ कारणे ठरतात जबाबदार

sakal (99).jpg
sakal (99).jpg

नाशिक : शरीराच्या विविध अंगांना मुंग्या येणे सामान्य बाब आहे. साधारण हात, पाय किंवा खांद्यांला अधिकवेळा मुंग्या येतात. याचं कारण लेटताना, बसताना किंवा उभे राहताना शरीराच्या याच अंगांवर सर्वात जास्त प्रेशर पडतं.. खूप वेळ पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्यातरी त्रासाचे लक्षण आहे. पण हाता पायांना मुंग्या का येतात, याचे कारण तुम्हाला माहित आहे का? तर त्यासाठी ही ५ कारणे जबाबदार ठरतात.

व्हिटॅमिनची कमतरता:
जर तुमच्या हात व पाय दोघांना ही मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता आहे. तसंच त्यामुळे तुम्हाला थकलेले किंवा आळसवाणे वाटेल.

Carpal tunnel syndrome:
खूप वेळ टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात व त्यामुळे हाताला मुंग्या येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने Carpal tunnel syndrome चा त्रास दूर होण्यास मदत होईल.

मानेची नस आखडणे:
मानेची नस आखडली गेल्यास पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते.

मधुमेह:
रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते व त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हायपरथायरॉईसम: थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य ठरेल.

काय आहेत लक्षणे?

शरीराच्या काही अंगांना मुंग्या आल्यावर त्या अंगांबाबत आपल्याला काहीच जाणवत नाही. ते अंग आपल्याला नाहीत असे वाटायला लागते. अशात जर तुम्ही  त्या ज्या ठिकाणी मुंग्या आल्या आहेत त्या अंगांना झटका दिला तर तुम्ही सामान्य होऊ शकता. काय करावे यावर उपायलसूण आणि सूंठजर तुम्हाला नेहमी मुंग्या येण्याची समस्या होत असेल तर सकाळी नैसर्गिक विधी झाल्यावर सूंठाचे काही तुकडे किंवा लसणाच्या दोन कळ्या चाऊन खाव्यात. याने तुम्हाला आराम मिळेल. कारण या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. पिंपळाची पानेपिंपळाचं झाड हे फार गुणकारी मानलं जातं. या झाडाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अॅंटी-ऑक्सीडेंट आणि मिनरल्स असतात. जर तुम्हाला नेहमीच ही समस्या होत असेल तर पिंपळाची ३-४ पाने मोहरीच्या तेलात उकळून घ्या. जेव्हा तुम्हाला मुंग्या येतील त्या जागेवर हे तेल लावा. तूपतूप सुद्धा या समस्येवर एक चांगला उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडं कोमट करुन घ्या आणि ते तळपायाला लावा. तुम्हाला होत असलेली मुंग्या येण्याची समस्या दूर होईल. ", 

गंभीर रोगाचे लक्षण नाहीये
अनेकदा काही लोकांना बसल्या बसल्या किंवा उभ्या उभ्या शरीराच्या काही अंगांना खासकरुन पायांना मुंग्या येतात. शरीराचा एक भार सुन्न होण्याला सर्वसामान्य भाषेत मुंग्या येणे असे म्हटले जाते. पण असे का होते हे अनेकांना माहीत नसतं. अशाप्रकारे अंगांना मुंग्या येणे सामान्य बाब आहे. हे कोणत्याही गंभीर रोगाचे लक्षण नाहीये. खरंतर जास्तवेळ एकाच पोजिशनमध्ये बसल्याने, किंवा उभे राहिल्याने असे होते. शरीराच्या ज्या भागात मुंग्या येतात त्या भागाल झटका दिल्यास किंवा तो अंग हलवल्यास मुंग्या जातात. चला जाणून घेऊ असे होण्याची कारणे...का येतात मुंग्या?


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com