घडण-मंत्र : कुतूहल

‘हे काय आहे? कसं आहे? का आहे?’ या प्रश्नांच्या जोरावरच बहुधा मनुष्याने आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीत सुरुवात करून थेट चंद्रापर्यंत मजल मारली आहे आणि आता मंगळावर नजर लावली आहे.
घडण-मंत्र : कुतूहल
Summary

‘हे काय आहे? कसं आहे? का आहे?’ या प्रश्नांच्या जोरावरच बहुधा मनुष्याने आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीत सुरुवात करून थेट चंद्रापर्यंत मजल मारली आहे आणि आता मंगळावर नजर लावली आहे.

- डॉ. भूषण शुक्ल

‘हे काय आहे? कसं आहे? का आहे?’ या प्रश्नांच्या जोरावरच बहुधा मनुष्याने आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीत सुरुवात करून थेट चंद्रापर्यंत मजल मारली आहे आणि आता मंगळावर नजर लावली आहे.

आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असणे हा मनुष्याचा स्थायीभाव आहे. लहानपणी तर या कुतूहलाचा अक्षरश- अतिरेक झालेला असतो. अजूनही पालकांवर विश्वास शिल्लक असल्याचे वय असल्याने पहिली दुसरीत शिकणारी मुले हे प्रश्न पहिल्यांदा आपल्याला विचारतात.

यात दोन गमती होऊ शकतात

उसंत न मिळू देणे - सतत प्रश्न विचारणे, एका उत्तरातून पुढचा प्रश्न विचारणे आणि पालकांना पाच मिनिटसुद्धा शांत न बसू देणे.

अडचणीचे प्रश्न विचारणे - देव, धर्म, सेक्स यांबद्दल अत्यंत टोकदार प्रश्न विचारून आपल्याला धर्मसंकटात टाकण्याचा उद्योग मुले अगदी आनंदाने आणि वारंवार करतात.

मुलाचे कुतूहल मारून टाकणे हा भयंकर उपाय आहे. कारण कुतूहल मरत नाही. फक्त हे प्रश्न सोडवायला मुले वेगळी व्यक्ती आणि माध्यम शोधतात. या कुतूहलाला विधायक दिशा देण्याचे अनेक मार्ग आहेत.

  • आपल्याला उत्तर निश्चित माहिती असल्यास ते लगेच आणि थोडक्यात देऊन टाकणे. पाल्हाळ न लावता मिळालेली नेमकी उत्तरे उपयोगी असतात.

  • उत्तर पूर्णपणे किंवा मुळीच माहिती नसल्यास ‘मला हे माहिती नाही. चल एकत्र शोधुया,’ असे स्वच्छ सांगता येते. घरात असलेल्या पुस्तकांमध्ये कधी उत्तरे सापडतात. पण बहुतेक उत्तरे आता इंटरनेट या माध्यमाच्या मदतीने शोधली जातात. पालक मंडळी बहुधा गुगलचा वापर करून लेख शोधतात. प्राथमिक शाळेतील मुलांना पटकन आणि खूपसे वाचता येत नसल्याने ते हा उपाय वापरत नाहीत. बहुसंख्य मुले यू-ट्यूबसारख्या दृश्य माध्यमांचा उत्तरे शोधायला वापर करतात. त्यामुळे जे शब्द आणि माहिती वाचून समजत नाही, ती ऐकून आणि व्हिडिओ बघून सहज समजते.

  • एखादा प्रश्न खूपच अडचणीचा वाटला (विशेषत- सेक्स वगैरे विषयांवरचा) आणि उत्तर देणे अवघड वाटत असल्यास, ‘मी याच उत्तर शोधतो,’ असे सांगून सहज शब्दांत उत्तर देता येईल असे स्वत- शोधून काढणे किंवा चांगला व्हिडिओ शोधून तो दाखवणे, असे करता येईल.

  • मुले फारच भंडावून सोडत असतील आणि प्रश्नांची मालिका संपतच नसल्यास प्रश्नाच्या संख्येचे किंवा वेळेचे बंधन घालायला हरकत नाही.

दोन महत्त्वाचे मुद्दे

  • प्रश्न कितीही विचित्र असला तरी मुलावर भडकणे हा उपाय नाही. त्यामुळे मुले प्रश्न विचारणे बंद करतात आणि दुरावतात. ‘अरेच्चा, तुला हा प्रश्न कुठे सापडला?’ म्हणून आपण कुतूहल दाखवले तर मुलाच्या मनात काय चालले आहे, हे सुद्धा समजते आणि आपले गैरसमजही दूर होतात.

  • यू-ट्यूब या माध्यमाविषयी - हे अत्यंत सहजसोपे आणि दृष्यमाध्यम असल्याने हे एक आकर्षक साधन बनले आहे. किमान दहा वर्षांपर्यंत तरी ‘यू-ट्यूब किड्स’ हे वेगळे ॲप मुलांना वापरायला लावावे. त्यामुळे चुकीच्या आणि धोकादायक गोष्टींपासून मुलांचे संरक्षण होते.

यू-ट्यूब सतत पुढचे आणि त्या विषयाशी संबंधित इतर व्हिडिओ स्वत-हून आपोआप दाखवत राहते. त्यामुळे किती वेळ झाला, याचे भानच राहात नाही. आणि आपले मूल सतत काहीतरी चांगले किंवा शैक्षणिक पाहाते आहे, या भाबड्या आशेने आपणही डोळेझाक करतो. यामुळे अनेक मुले या माध्यमांच्या आहारी जातात आणि भलते प्रश्न उभे राहतात.

या इंटरनेटच्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत आणि त्यांच्या उपायाबाबत पुढील काही लेखांमध्ये सविस्तर चर्चा करुया...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com