
हेल्दी डाएट : उन्हाळ्यासाठी भारतीय आहार
- डॉ. रोहिणी पाटील
उन्हाळा जवळ आल्यावर देशभरात लोक हंगामी फळांच्या शोधात असतात. उन्हाळ्यात हलके अन्न खाणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि हे तुम्ही उपाशी न राहता ही सहज करू शकता. तुम्हाला माहीत आहे का, तुमचा उन्हाळ्यातील आहार हा इतर ऋतूंपेक्षा वेगळा असायला हवा? कारण विविध प्रकारच्या हंगामी रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी आहारात ऋतुमानानुसार बदल करणे आवश्यक असते. सर्व घटकांचा काळजीपूर्वक विचार करून उन्हाळ्यात आपण अन्न सेवन केले पाहिजे. अत्यंत मसालेदार, गरम, पोटाला जड आणि तळलेले अन्न खाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे अतिसार, पोटदुखी, निर्जलीकरण, त्वचेच्या समस्या, शरीरातील ऊर्जा कमी होणे आणि थकवा जाणवणे यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. सर्वांनी हे खालील मुद्दे ध्यानात ठेवावेत.
आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
स्वयंपाक करताना कमी मसाले वापरा.
तुम्ही खात असलेला आहार हलका आहे याची खात्री करा.
वेगवेगळी आरोग्यदायी पेये आणि रसांच्या मदतीने शरीरातील द्रव्यांची पातळी चांगली ठेवा.
निरोगी उन्हाळी डाएट प्लॅन
पहाटे
१/४ लिटर पाण्यात १ संपूर्ण लिंबू घाला.
नाश्ता-
पर्याय १ - १ ग्लास प्रथिनेयुक्त स्मूदी.
पर्याय २ - १ बाउल घरगुती पोहे किंवा उपमा
सकाळी १०-११च्या सुमारास
१ वाटी कलिंगड किंवा १ वाटी खरबूज किंवा १ वाटी आंबा.
दुपारचे जेवण
१ वाटी नाचणी आंबिल
संध्याकाळचा स्नॅक्स
१ ग्लास पन्हे किंवा १ ग्लास सातू पेय
रात्रीचे जेवण
पर्याय १
१ वाटी मूग डाळ खिचडी (१ चमचा तूप घाला) + १ ग्लास ताक
पर्याय २
१ ज्वारी भाकरी + १ वाटी कोणतीही हंगामी भाजी.
कॅलरीज (ऊर्जा) - १०९७ किलोकॅलरी
प्रथिने - २१.९८ ग्रॅम
कर्बोदके - २१४.२१ ग्रॅम
फॅट - ७.५८ ग्रॅम
फायबर - ८.५ ग्रॅम
Web Title: Dr Rohini Patil Writes Healthy Diet Indian Food For Summer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..