लॉकडाऊन कालावधीत झोपेचं गणित चूकतंय, अजिबात दुर्लक्ष करू नका...

लॉकडाऊन कालावधीत झोपेचं गणित चूकतंय, अजिबात दुर्लक्ष करू नका...

मुंबई – कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. विषाणुंचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले वर्क फ्रॉम होम तसेच घराबाहेर पडणे अशक्य असल्याने अनेकांचे दिवसभराचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. या सा-याचा परिणाम झोपोवर होत असून नागरिकांना निद्रानाशासारख्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

रात्री उशीरा झोपणे, झोपेच्या वेळेत मोबाईल फोन, टिव्ही अथवा लॅपटॉप पाहणे, सकाळी उशीरा उठणे अशा सवयींमुळे झोपेच गणित जूळत नसल्याचे पहायला मिळते. वर्क फ्रॉम होममुळे सतत एका ठिकाणी बसून काम केल्यामुळे शारीरिक हालचालींकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे झोपेवर परिणाम होतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मक विचारांच्या संपर्कात आल्यामुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. 

लॉकडाउनमुळे घरबसल्या सगळी कामं होत आहेत. त्यामुळे आवश्यक  तितकी शरीराची हालचाल होत नाही. परिणामी, रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, झोप न येणं याचे प्रमाण अधिक वाढले आहे. दिवसा झोपणे, काम करता करता अवेळी झोप काढणे यामुळे रात्रीच्या झोपेवर विपरित परिणाम होत असल्याचे पहायला मिळते.

 झोप न येण्यामागची कारणे कोणती?

  • शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी होणे.
  • वर्क फ्रॉम होममुळे कामाच्या वेळेत झालेले बदल.
  • घरी राहिल्याने स्क्रीनटाइममध्ये वाढ होत आहे आणि मोबाइल फोन्सचा अतिवापर होत आहे.
  • नोकरीविषयक चिंता सतावणे
  • दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नकारात्मक येणे.

चांगली झोप येण्यासाठी काय करता येईल

  • झोपेचे वेळापत्रक आखा - रात्री झोपण्याची वेळ तसेच सकाळी उठण्याची वेळ निश्चीत करा. झोपेचे वेळापत्रक बिघडणार नाही याची खबरदारी घ्या.
  • स्क्रीन टाईमवर मर्यादा आणा - स्क्रीन टाईम वाढणार नाही याकडे लक्ष द्या. स्क्रीन टाईम वाढल्याने झोपेचे गणित बिघडू शकते.
  • ताजं खा - पचनसंस्थेवर वाईट परिणाम करणारे अन्नपदार्थ खाणं टाळा. त्यामुळे तुमचं मनही प्रसन्न राहील.
  • चहा, कॉफी नकोच - चहा, कॉफी सारख्या पेयांचे अतिसेवन करू नका.
  • प्राणायाम करा - मानसिक स्वास्थ उत्तम ठेवणारे व्यायाम करा. हे व्यायाम प्रकार झोपायला जाण्याआधी केल्यास चांगली झोप लागण्यास मदत होईल.
  • कार्यरत राहा - दिवसभरातून किमान ३० मिनिटं शरीराची हालचाल करा. डान्स किंवा घरच्या घरी व्यायाम करू शकता.
  • गॅजेट्सचा अतिवापर टाळा - झोपायच्या आधी किमान दोन तास सोशल मीडियाचा वापर करणं टाळा; जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल.
  • छंद जोपासा - मानसिक तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासणे उत्तम ठरेल. मोकळ्या वेळेत नकारात्मक विचार मनात न येऊ देता आपल्याला आवडणा-या गोष्टी करा.

during lockdown sleep time table is going for toss read very important news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com