हिवाळ्यात वजन कमी करायचंय? आहारात हवे हे पाच पदार्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

.
हिवाळ्यात वजन कमी करायचंय? आहारात हवे हे पाच पदार्थ

हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्यामुळे भरपूर भूक लागते. त्यामुळे बहुतेक लोकांचे वजन वाढते. महत्वाचे म्हणजे या काळात अन्नपदार्थ लवकर पचतात. थंडीच्या काळात अनेकांना चाट, भजी तसेच इतर मसालेदार पदार्थ खायलाही आवडतात. त्यामुळे वजन साहजिक वाढते. काही लोकांच्या पोटाची चरबीही वाढते. अशावेळी काही पदार्थ या ऋतूत खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.

गाजर - व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम आणि लोह हे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे घटक गाजरामध्ये असतात. गाजरामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होते. त्वचा चमकदार होते. जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही रोज सकाळी एक ग्लास गाजराचा ज्यूस पिऊ शकता.

बीट- हिवाळ्यात बीट खाणे अतिशय चांगले. बीटामध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फायबर, मॅंगनीज यांसारखे पोषक घटक असतातयामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. तसेच बीटाचा रस प्यायल्याने तुमच्या त्वचेवरही नैसर्गिक चमक दिसेल. तसेच वजन कमी करणे सोपे होते.

मेथी- हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या अतिशय छान मिळतात. त्यात मेथी तर ताजी आणि मोठ्या पानांची असते. मेथीमध्ये  जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम, फायबर असे अनेक पोषक घटक असतात.मेथीच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते. हिवाळ्यात अनेकजण मेथीचे पराठे, मुठिया, कोशिंबीर वगैरे पदार्थ करतात.  मेथी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

गवती चहा-थंडीच्या दिवसात शरीर डिटॉक्स करण्यासाठी गवती चहाचा वापर करणे योग्य ठरते. हिवाळ्यात या चहाच्या वापराने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहते. तसेच चयापचय प्रणालीवरही परिणाम होत नाही. 

पेरू- पेरू खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते.पेरू चयापचयसाठी फायदेशीर फायबरने समृद्ध आहे. सकाळी पेरू खाणे टाळावे, यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. मात्र त्यानंतर तो दिवसभर कधीही खाऊ शकता.

loading image
go to top