esakal | World Sight Day 2021: डोळे चमकदार ठेवायचेत, हे पदार्थ खा
sakal

बोलून बातमी शोधा

Eyes

World Sight Day 2021: डोळे चमकदार ठेवायचेत, हे पदार्थ खा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आंखो मे तेरी अजब सी अजब सी अदाये है.... आंखो की गुस्ताखिया... डोळे हे जुलमी गडे...अशी गाणी डोळ्यांचं महत्व संगीतातून सांगतात. लोकांना जसे काळेभोर डोळे आवडतात तसेच एश्वर्या रायच्या निळ्याभोर डोळ्यांची वेगळी जादू आहे. असे हे डोळ आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा भाग.ज्याप्रमामे बाहेर जाताना आपण डोळ्यात काजळ, आयलायनर लावून डोळ्याचे बाह्यसौंदर्य खुलवतो, त्याप्रमाणे त्याचे अंतर्गत सौंदर्य जपणे महत्वाचे आहे. जर समतोल आहार घेतला तर डोळ्याचे सौंदर्य वाढून तुमचे डोळे अधिक तेजस्वी आणि चमकदार होउ शकतात. त्यासाठी रोज काही पदार्थांचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे.

Milk

Milk

दुग्धजन्य पदार्थ
रेटिना आणि कोरॉइडसाठी दूध, दही, कॉटेज चीज खाणे चांगले आहे, या घटकांत खनिज असल्याने हे पदार्थ खाल्ल्याने आपले डोळे निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होते.

हिरव्या भाज्या

पालक, लेट्यूस, ब्रोकोली, कोबी सारख्या अँटीऑक्सिडंट युक्त हिरव्या भाज्या खाणे गरजेचे आहे. या भाज्या खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांची चमक नैसर्गिकरीत्या सुधारेल. झिंक, ल्यूटिनचे हे स्त्रोत असून त्यामुळे डोळ्यांना पोषण मिळून ते चमकदार होतात.

गाजर

डोळ्यांचे उत्तम आरोग्य राखायचे असेल तर नियमित गाजर खाणे अतिशय चांगले. गाजरातील व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांचे चैतन्य वाढवून चमक टिकवून ठेवण्यास मदत करते.

अंडी

अंड्यातील पिवळा बलक खाल्लायने त्यातून व्हिटॅमिन ए, ल्यूटिन, झिंक हे घटक मिळतात. जे वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन, मोतीबिंदू कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच कॉर्नियाचे संरक्षण करून डोळे निरोगी राखण्यास मदत करतात.

आंबट फळे

आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादींमध्ये तसेच स्ट्रॉबेरी, श्रुजबेरी, रासबेरी यांमध्येही ‘क’ जीवनसत्व असते. ही फळे डोळ्यात चमक आणण्याचे काम करतात. मोतीबिंदूची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे काम ‘क’ जीवनसत्व करते. तसेच दृष्टी सुधारण्यासही मदत करते.

सुका मेवा

अक्रोड, पाइन नट, काजू, बदाममध्ये व्हिटॅमिन ई, जस्त आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. सुका मेवा खाल्ल्याने डोळ्यांच्या पेशींचे संरक्षण होते. तसेच डोळे विकार, जळजळ आणि कोरडेपणा जाणवत नाही.

हेही वाचा: अत्यवस्थ रुग्णांपैकी दर पाचवी रुग्ण कोरोना लस न घेतलेली गर्भवती महिला

ओमेगा -3
ओमेगा -3 डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. हा घटक कोरड्या डोळ्याच्या सिंड्रोमशी लढतो आणि डोळ्यांतील आर्द्रतेचे प्रमाण चांगले ठेवण्यास मदत करतो. कॉड लिव्हर तेल, सॅल्मन, सार्डिन, मॅकरेल, अंबाडी बिया हे घटक ओमेगा -3 चे पोषण देतात.

loading image
go to top