
डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
अंडी हा एक अतिशय उपयुक्त, स्वस्त आणि पोषणमूल्यांनी समृद्ध खाद्यघटक आहे. अंड्याला ‘सुपरफूड’ का म्हणतात, याचं कारण म्हणजे त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व ९ आवश्यक अमिनो अॅसिड्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, हेल्दी फॅट्स, आणि भरपूर बायो-अव्हेलेबल (जैवसुलभ) प्रोटिन असतं; पण अंड्यांबद्दल एक मोठा गैरसमज अजूनही लोकांच्या मनात आहे - तो म्हणजे ‘अंडं खाल्लं की कोलेस्टेरॉल वाढतं आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.’ मात्र, ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे आणि जुन्या, कालबाह्य संशोधनावर आधारित आहे.