महिलांनो, तिशी ओलांडली? महत्त्वाच्या 5 टेस्ट करायलाच हव्यात...!

महिलांसाठी वयाचे 30वे वर्ष खूप महत्त्वाचे असते.
Women Health
Women HealthWomen Health esakal

वय वाढत जाते तसतसे शरिरामध्ये कित्येक बदल होत असतात. वाढत्या वयाचा सर्वात जास्त परिणाम मेटॉबॉलिझमवर पडतो आणि मेटॉबॉलिझम कमी झाल्यास डायबिटीज आमि हायपरटेंश सारखे आजार होतात. महिलांसाठी वयाचे 30वे वर्ष खूप महत्त्वाचे असते. या वयात माहिलांवर कित्येक जबाबदाऱ्या आणि मानसिक ताण यामध्ये संतुलन ठेवणे अवघड असते ज्याचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. 30 वर्षामध्ये महिलांच्या शरिरामध्ये कित्येक हार्मोनल बदल होत असतात. याच कारणामुळे महिला हेल्थ एक्सपर्टस या वयात महिलांना 5 टेस्ट करण्याचा सल्ला देतात.

कम्प्लीट ब्लड काउंट (Complete blood count) : कम्प्लीट ब्लड काउंट ला CBC टेस्ट असेबी म्हणतात. ही एक ब्लड टेस्ट असते ज्यामध्ये पुर्ण आरोग्याबाबत माहिती मिळविता येते. सीबीसी टेस्टद्वारे कोणत्याही प्रकारचे इन्फेकशन, एनिमिया, डिसऑर्डर, आणि काही केसेसमध्ये कॅन्सरचा देखील शोध लावता येतो. कम्प्लीट ब्लड काउंट मध्ये लाल रक्त पेशी (R.B.C s), पांढऱ्या रक्त पेशी (W.B.C s), हिमोग्लोबिन, हेमटोक्रिट (Hct) आणि प्लेटलेट्सबाबत सर्व माहिती मिळते.

थायराईड फंक्शन टेस्ट (Thyroid function test) : भारतामध्ये जवळपास दहा पैकी एका माहिला थॉयराईडची समस्या आहे. याची लक्षण सुरवातीला कमी असतात आणि नेहमी त्याकडे खूप काळ दुर्लक्ष होते. त्यामुळे 30 नंतर महिलांनी थाईरॉईडची चाचणी केली पाहिजे. हेल्थ एक्सपर्टनुसार अनियमित पिरियड्स, अचानक वजन वाढणे, केस गळणे, इनफर्टिलिटी ही याची साधारण लक्षण आहे.

Women Health
हडपसर गाडीतळावर धक्का मारून प्रवाशाचा मोबाईल चोरला

लिपिड प्रोफाइल (Lipid profile) : लिपिड प्रोफाइलमध्ये रक्तातील विशिष्ट चरबीयुक्त अणूंचे प्रमाण मोजले जात ज्याला लिपिड असे म्हणतात. त्यामध्ये कित्येक प्रकारचे कोलेस्ट्रॉलबाबत माहिती घेतली जाते. ही टेस्ट हृदय विकार आणि रक्तवाहिण्यांच्या आरोग्याबाबत तपासणी करण्यासाठी फायेदशीर ठरते. लिपिड प्रोफाइल समजल्यामुळे खाण्या पिण्याच्या सवयी, पथ्य, तणाव, व्यायाम, आणि लाईफस्टाईट सुधारता येऊ शकते. साधरणत: थॉयराईड किंवा पॉलिसिस्टिक ओवरी डिसीज खराब लिपिड प्रोफाईल संबधित असते.

बल्ड शुगर (Blood Sugar) : 35-49 च्या वयामध्ये काही महिलांना डायबिटीज होतो. काही लोकांना खूप काळापासून डायबिटीज असतो पण खास लक्षण नसल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते. डायबिटीजमुळे ब्लड शुगर अचानक वाढू शकते ज्याचे परिणाम गंभीर असू शकतात. डायबिटीजमुळे शरिरातील इंस्युलिन व्यवस्थित तयार होऊ शकत नाही. एनर्जी आणि बल्ड शुगर वापर करण्यासाठी इंस्युलिन खूप गरजेची आहे.

Women Health
हडपसर गाडीतळावर धक्का मारून प्रवाशाचा मोबाईल चोरला

पैप स्मीयर टेस्ट (PAP smear) : महिलांमध्ये सर्वाइकल कॅन्सर टेस्टच्या केसेस वेगाने वाढ होऊ शकते. सर्वाइकल कँन्सर सुरवातीच्या स्टेजला असतानाच पैप स्मीयर स्क्रीनिंगद्वारे शोधता येतो. या टेस्टद्वारे सर्वाईकल पेशांमध्ये होणाऱ्या बदलांबाबतही माहिती मिळविता येते. पेशींमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये पुढे जाऊन कँन्सरमध्ये परावर्तित होतो.

हेल्थ एक्सपर्टनुसार, 30 पेक्षा जास्त वय असलेल्या माहिलां दर 5 वर्षांमधून एकदा स्मीयर टेस्ट आवर्जून केल्या पाहिजे.

Women Health
हडपसर गाडीतळावर धक्का मारून प्रवाशाचा मोबाईल चोरला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com