
निलगिरीचं झाड आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असून अनेक रोग दूर करू शकतं.
Eucalyptus Leaves Benefits : निलगिरीचं झाड हे सदाहरित झाड आहे. हे केवळ भारतातच नाही, तर परदेशातही आढळतं. निलगिरीचं झाड प्रामुख्यानं ऑस्ट्रेलियन आहे. हे झाड आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असून अनेक रोग दूर करू शकतं. या झाडाच्या पानांमुळं सर्दी, खोकला यांसारखी संसर्गाची लक्षणे घरच्या घरी सहज कमी करता येतात. याशिवाय, सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यावरही हे झाड 'रामबाण' उपाय आहे.
यूकेलिप्टस (Eucalyptus) म्हणजेच, निलगिरीच्या पानांचा उपयोग दमा आणि श्वासोच्छवासाचा त्रास दूर करण्यासाठीही केला जातो. 'दमा' ही एक मोठी समस्या आहे, त्याचा झटका खूप धोकादायक मानला जातो.
आपल्याला अनेकदा सर्दी, खोकला यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो, अशा स्थितीत या समस्यांवर मात करण्यासाठी निलगिरी खूप फायदेशीर ठरते. निलगिरीची पानं घसा खवखवणं, साइनसाइटिस आणि ब्राँकाइटिस इत्यादींवर गुणकारी आहेत. सर्दीच्या समस्येवर हा एक अतिशय प्रसिद्ध घरगुती उपाय आहे. याशिवाय, खोकल्यासाठीही हे उपयुक्त मानलं जातं.
निलगिरीची पानं अनेकदा हर्बल चहाच्या रूपात वापरली जातात, परंतु जर तुम्ही नियमितपणे निलगिरीचा चहा प्यायला, तर तुम्ही श्वास आणि संसर्गाच्या समस्येवर सहज मात करू शकता. निलगिरीच्या पानांचा चहा तयार करण्यासाठी, प्रथम निलगिरीची पानं पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर ही पानं पाण्यात पूर्णपणे उकळा. पाणी थोडं कोमट झाल्यानंतर, ती पानं काढून घ्या आणि त्याचा रस सेवन करा.
निलगिरी दात निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप मदत करते. तुम्ही याचा वापर माउथवॉश म्हणूनही करू शकता. वास्तविक, निलगिरी दातांमध्ये असलेल्या बॅक्टेरियाशी लढण्यासाठी खूप सक्रिय आहे. याशिवाय, हे बुरशीजन्य संक्रमण आणि जखमा काढून टाकण्यास देखील मदत करू शकते. यासोबतच हे स्नायू आणि हाडांचे दुखणे दूर करण्याचे काम करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.