actor-Vijay-Andhalkar
actor-Vijay-Andhalkar

video : 'स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी फिटनेस जपलाच पाहिजे'

Published on

पुणे - उत्तम आरोग्यासाठी व्यायाम, सकस आहार, व्यवस्थित झोप गरजेची असते. कारण, वेलनेसचा संबंध फिटनेसशी असतो. त्यासाठी आपण आनंदी असावे. अभिनय क्षेत्रात असल्यामुळे चित्रीकरणाच्या वेळा पुढेमागे होतात. त्यावेळी मी कधी सकाळी, संध्याकाळी नाहीतर रात्री व्यायाम करतो. अनेकदा सेटवरच लाईटच्या रॉडच्या मदतीने व्यायाम करतो. चित्रीकरण नसल्यास सकाळीच व्यायाम करतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्राणायाम, योगा आणि शांततेत चिंतन करतो. माझा आहार शाकाहारी आणि मांसाहारी आहे, मात्र मी बेकरी उत्पादने खात नाही. तेलकटही खात नाही. दिवसातून चार लिटर पाणी पितो. सर्व प्रकारची फळे खातो. चित्रीकरणामुळे अनेकदा जेवणाच्या वेळा चुकतात. मात्र, जसा वेळ मिळेल, तसे जेवण करतो. 

‘ढोलताशे’ चित्रपटातील भूमिकेसाठी मला ११ किलो वजन वाढवावे लागले होते. याउलट, ‘७०२ दीक्षित’ या चित्रपटात ९ किलो वजन कमी केले. ‘वर्तुळ’ या मालिकेत माझा फिटनेस मजबूत होता, मात्र ‘लग्नाची वाइफ, वेडिंगची बायको’ या मालिकेत सर्वसामान्य दिसणारा मुलगा हवा होता. त्यामुळे, मला माझी पूर्ण शरीरयष्टी बदलावी लागली. भूमिकेमुळे मी हे बदल करत गेलो. माझा फिटनेसचा आदर्श अरनॉल्ड श्वार्जनेगर आहेत. सध्या त्यांचे वय ६०पेक्षा अधिक असले, तरी त्यांची शरीरयष्टी बळकट आहे. त्यामुळेच ते कोट्यवधी प्रेक्षकांचे आदर्श आहेत. त्याचप्रमाणे निखिल पोटे माझे फिटनेस गुरु आहेत. त्यांनी अनेकांचा मेकओव्हर केला आहे.  महत्त्वाची गोष्ट, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी फिटनेस आणि वेलनेस जपलाच पाहिजे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तीच गोष्ट सध्या कोरोनाच्या काळात सर्वांना कामी येते आहे. 

(शब्दांकन : अरुण सुर्वे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com