अजबच! देशात पहिल्यांदाच कोरोना रूग्णाचे केले डबल फुफ्फुस प्रत्यारोपण

सुस्मिता वडतिले 
Saturday, 12 September 2020

देशात पहिल्यांदाच असे झाले आहे की, कोरोनाबाधित रूग्णाच्या दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण केले गेले आहे. वैद्यकीय जगात हा एक चमत्कार मानला जात आहे.

पुणे : तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये एका कोरोनाबाधिताचे जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णाचे डबल फुफ्फुस प्रत्यारोपण (डबल लंग ट्रांसप्लांट) केले आहे. देशात पहिल्यांदाच असे झाले आहे की, कोरोनाबाधित रूग्णाच्या दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण केले गेले आहे. वैद्यकीय जगात हा एक चमत्कार मानला जात आहे. आता रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून आपल्या घरी परत गेला आहे.

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील फुफ्फुस प्रत्यारोपण विभाग प्रमुख डॉ संदीप अट्टवार यांनी सांगितले की, रुग्णाचे नाव रिजवान (मोनू) आहे. ज्यांचे वय 32 आहे. रिजवान हा पंजाबच्या चंदीगडमधील राहणारा आहे. रिजवान सारकोइडोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त होता. ज्यामुळे त्याचे फुफ्फुस खूप खराब झाले होते. या आजारामुळे रिजवानला त्याच्या फुफ्फुसात फायब्रोसिस झाला होता. पण कोरोनामध्ये असुरक्षित असताना त्याची प्रकृती खालावत चालली होती. तसेच शरीरात ऑक्सिजनची मागणी वाढत जात होती. 

त्यानंतर केवळ फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणाने रिजवान यांचे प्राण वाचू शकले आहे. डॉ.अट्टवार यांनी सांगितले की, आम्ही रिजवानसाठी डोनर शोधत होतो. तितक्यात योगायोगाने कोलकाता येथे ब्रेनडेड घोषित केलेला एक रुग्ण मिळाला. त्यानंतर लवकरात लवकर कोलकाताहून हैदराबादला फुफ्फुस आणले गेले आणि रिजवान यांचे ऑपरेशन करण्यात आले. डॉ.अट्टवार म्हणाले की, रिजवान सध्या ठीक आहे आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time in the country, a double lung transplant has been performed on a corona patient in Hyderabad