Video : फिटनेस कॉर्नर : मुलांसह करू शकणारे व्यायाम

Shruti-Jahagirdar
Shruti-Jahagirdar

मुलांकडे लक्ष देता देता व्यायाम करणे अतिशय अवघड काम आहे, मात्र तुम्ही मुलांना तुमच्या व्यायामाचा एक भाग बनवलात तर ते तुमचे सगळ्यात चांगले वर्कआऊट पॅरेंटस् बनू शकतात. ते तुमचे बेस्ट चीअर लिडरही बनतात. ही मुलांसाठी एक मजेशीर ॲक्टिव्हिटी तर होईलच, पण तुम्हालाही मुलांबरोबर चांगला वेळ घालवता येईल.

येथे सांगितलेले सर्व व्यायाम खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहून मग करायला सुरुवात करा.

प्लॅन्क - पुशअप स्थितीत जा आणि आपले हिप वर 
होऊ न देता पोझिशन होल्ड करा. आपल्या मुलांना सामील करा. आपल्या पाठीवर बसवा आणि या प्रक्रियेत स्वत:ला आव्हान द्या. 

पुश अप - हा व्यायाम सर्वांना माहीत आहे. आपल्या मुलांना पाठीवर बसवा आणि त्यांना रिपिटेशनली १-१० मोजायला सांगा. त्यांना ते करण्यात खूप मजा येते आणि तुम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळेल.

सिट अप्स - हा बेस्ट पार्टनर वर्क आऊट आहे! हा मुलांना खूप आवडतो. आपले गुडघे दुमडलेले आणि पाय जमिनीवर ठेवून एका चटईवर पूर्णपणे बसा. आपल्या मुलास आपले गुडघे घट्ट पकडण्यास सांगा. १ रिपिटिशन पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या मागे चटईला स्पर्श करेपर्यंत खाली जा आणि वर या. दोन्ही हात डोक्यामागे पकडा.

स्टार जंप - शक्य तितकी उंच उडी घ्या आणि आपले दोन्ही पाय आणि हात दोन्ही बाजूला हवेत उघडा एका स्टार शेपमध्ये. आपल्या मुलांसह १० वेळा रिपिटेशन करा.

जम्पिंग जॅक्स - आपण सर्वांनी बालपणात एक अतिशय लोकप्रिय व्यायाम केला आहे, तो हाच. आपल्या मुलांसोबत एक मिनिट म्युझिक लावून हा व्यायाम करा.

व्यायामादरम्यान मुलांना त्यांच्या पालकांच्या आसपास राहणे आवडते आणि हळूहळू पालकांचे अनुकरण करण्यास सुरुवात होते. त्यांनी आपल्याबरोबर व्यायाम केल्यास ते रात्रीदेखील चांगले झोपी जातील. हे व्यायामप्रकार संपूर्ण कुटुंबासोबत करून पाहा.

(लेखिका राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉलपटू, प्रमाणित फिटनेस ट्रेनर आणि स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट आहेत. त्या HaloMiFitness या स्टार्टअपच्या संस्थापक सीईओ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com