आरोग्यातही एकमेकांना साथ! नवरा-बायकोने हेल्दी राहण्यासाठी वाचा खास टीप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यातही एकमेकांना साथ! नवरा-बायकोने हेल्दी राहण्यासाठी वाचा खास टीप्स

आरोग्यातही एकमेकांना साथ! नवरा-बायकोने हेल्दी राहण्यासाठी वाचा खास टीप्स

आपला जोडीदार फिट असावा असे प्रत्येक नवरा- बायकोला वाटते. त्यासाठी आपल्या पार्टनरला काय हवं- नको याकडे बायकोचे जरा जास्त लक्ष असते. पण वाढत्या वयानुसार काहीना काही तब्येतीच्या तक्रारी निर्माण होतातच. म्हणून दोघांनीही फिट राहणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी योग्य नियोजन करून काहींना काही हेल्थ एक्टीविटीज सुरू करणे गरजेचे आहे. पती- पत्नीनी एकमेकांना यासाठी साथ देणे गरजेचे आहे. दोघांनी मिळून हे कार्य केले तर दोघेही एकमेकांच्या साथीने फिट राहतील.

हेही वाचा: सुदृढ आरोग्यासाठी योगासने महत्वाची, जाणून घ्या महत्व

आउटडोर एक्टीव्हीटी करा

हेल्दी राहण्यासाठी तुम्ही पार्टनरसोबत आउटडोर एक्टीव्हीटी करणे हा चांगला पर्याय आहे. यात तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जोडीदाराबरोबर टेनिस, बॅडमिंटन असे खेळ खेळू शकता. तुम्ही दोघे मिळून योगाही करू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय गती वाढेल. तसेच वजन कमी होण्यास मदत होईल.

आरोग्य तपासणी करा

महिलांप्रमाणेच पुरुषांनीही तिशीनंतर काही आरोग्य तपासणी करून घ्यावी. जर जोडीदाराला जास्त भूक लागत असेल तर तर कोलेस्ट्रॉल पातळी तपासा. थायरॉईड, बीपी, मधुमेह इत्यादींची तपासणी दर 2 महिन्यांनी करा. कोणतीही आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरकडे जा.

गोड खाणे टाळा

वाढत्या वयात मधुमेह होण्याचा धोका असतो. त्यामुळे वयाच्या 35 नंतर जोडीदार खूप गोड खात असेल तर त्याला त्यापासून रोखा. जोडीदाराला हेल्दी पदार्थ खाण्यास प्रोत्साहन द्या. तुम्ही त्यांच्यासाठी गूळ, मध, ब्राऊन शुगर इत्यादी आरोग्यदायी पर्याय निवडू शकता. असे केल्यास वजन वाढणार नाही तसेच इतरही आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत.

हे पदार्थ खायला सांगा

रोजच्या आहारात व्हिटॅमिन ए, बी12, सी, ओमेगा 3, फोलेट, आयरन, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी गोष्टींचा समावेश असावा. त्यामुळे जोडीदाराचे शारिरिक, मानसिक आरोग्य चांगले राहील. तसेच दैनंदिन आहारात फळे,हिरव्या भाज्या, ज्यूस, सूप यांचाही समावेश केल्यास दिवसभर ते उत्साही राहतील.

loading image
go to top