esakal | आजारातून बरे झाल्यानंतर जाणवतोय अशक्तपणा? मग हे उपाय करा आणि अशक्तपणा कायमचा घालवा
sakal

बोलून बातमी शोधा

get reed of weakness after recovering from illness

आता चिंता करू नका. तुमचा अशक्तपणा कायमचा दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकाल.     

आजारातून बरे झाल्यानंतर जाणवतोय अशक्तपणा? मग हे उपाय करा आणि अशक्तपणा कायमचा घालवा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : कोरोना नावाच्या महामारीचे संकट संपूर्ण जगावर आहे. अनेक लोकं या महामारीच्या विळख्यात सापडत आहेत. अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक लोकांनी या महामारीवर मात केली आहे ही दिलासादायक बाब आहे. पावसाळा सुरु असल्यामुळे आजारपण प्रत्येकाच्याच वाट्याला येत आहे. कधी सर्दी तर कधी खोकला तर कधी साधा व्हायरलचा ताप प्रत्येकजण यामुळे त्रस्त आहे. 

मात्र या आजारांतून बरे झाल्यानंतरही अनेक दिवस अशक्तपणा अंगात राहतो. कित्येक लोकांना कमजोरी येते. तर काही लोक उठून बसूही शकत नाहीत. पण आता चिंता करू नका. तुमचा अशक्तपणा कायमचा दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकाल.     

हे उपाय करा आणि अशक्तपणा घालवा 

  • लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती बळकट बनवतात.
  • झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून सेवन करावे.
  • शुद्ध तुपात कांदा भाजून घ्यावा आणि त्याचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे अशक्तपणा दूर होईल आणि फुप्फुसांना फायदा होईल.
  • दिवसभर ऊर्जा पातळी राखण्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभर्‍याचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होईल.
  • दीर्घ काळापर्यंत उपाशी राहू नये. प्रत्येक दोन ते तीन तासांच्या अंतराने थोड्या-थोड्या प्रमाणात जेवण करीत राहावे. यामुळे पचन क्रिया चांगली राहील. जेवणानंतर लगेचच झोपू नये, यामुळे जास्त आळस येतो.
  • दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते. यामुळे व्यक्ती लवकर थकून जातो.
  • कामाच्या अधिक व्यापामुळे वेळेवर जेवण होत नाही. त्यामुळे जंक फूडचे सेवन अनेकजण करतात; परंतु जंक फूड खाण्याचे टाळावे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top