साध्या लसणापेक्षा सातपट गुणकारी काश्मिरी लसूण, अनेक आजारांपासून झटपट मुक्तता

kashmiri garlic
kashmiri garlicgoogle
Updated on

जवळपास सर्वांच्या जेवणात लसणाचा समावेश असतो. तसेच साध्या लसणाच्या गुणाधर्मांबद्दल आपल्याला माहिती देखील आहे. मात्र, हिमालयीन लसणाबद्दल (kashmiri garlic) तुम्ही कधी ऐकलंय का? अनेकांना या लसणाबद्दल माहिती नाही. मात्र, हा लसूण उत्तम औषधी गुणधर्म असलेल्यांपैकी एक आहे. यालाच काश्मिरी लसूण किंवा पोथी लसूण देखील म्हणतात. यामध्ये अ‌ॅलिन आणि अ‌ॅलिनेज नावाची दोन संयुगे असतात. ते एकत्र केल्यानंतर अलिसिन नावाचे कंपाऊंड तयार होते. त्यामुळे त्याची चव तिखट असते. तुलनात्मकरित्या हिमालयीन लसूण साध्या लसणापेक्षा सातपट शक्तीशाली (health benefits of kashmiri garlic) आहे. चला तर मग जाणून घेऊया हिमालयीन लसणांच्या गुणाधर्माबद्दल...

kashmiri garlic
कॅल्शियमची कमतरता आहे? तर या गोष्टी खाण्यास करा सुरुवात

काश्मिरी लसूण पोषक तत्वांनी समृद्ध आहे -

हिमालय, काश्मिरी किंवा पोथी लसूण पोषक तत्वांनी समृद्ध आहे. मॅंगनीज, व्हिटॅमिन बी -6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी -1 हे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे कर्करोग, थायरॉईड, दमा, कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करा -

हिमालय लसूण शरीरातील उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो. संशोधनात असे दिसून आले आहे की, हे लसूण मानवी शरीरात कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडचे प्रमाण सुमारे 20 मिलीग्राम कमी करू शकते. लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या सोलून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने वाढलेले कोलेस्टेरॉल आपोआप कमी होईल.

सर्दी आणि खोकल्यासाठी लाभदायक -

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हिमालयीन लसणाच्या नियमित सेवनाने सर्दी आणि खोकल्याचा धोका 50 टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकतो. यासह, ते खाल्ल्याने इतर रोगांची लागण होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात कमी होते. खरंतर, त्यात असलेले अॅलिसिन नावाचे एक संयुग सर्दी आणि खोकला मुळापासून दूर करण्याचे काम करते. सर्दी खोकला झाला असेल तर लसणाच्या ठेचलेल्या दोन पाकळ्या एका ग्लासभर पाण्यात घाला आणि त्या पाण्याचे सेवन करा. असे केल्याने सर्दी-खोकल्यापासून त्वरीत आराम मिळेल.

कर्करोगाशी लढण्यास मदत करा -

लसणामध्ये नैसर्गिकरित्या ऑर्गनोसल्फर कंपाऊंड असते, ज्याला डायलील ट्रायसल्फाइड म्हणतात. हे शरीरात उपस्थित असलेल्या कर्करोगाच्या पेशी मारण्यात मदत करून कर्करोगाशी लढण्याची क्षमता प्रदान करते. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाच्या संशोधकांना असे आढळले आहे की जे रुग्ण हिमालय किंवा काश्मिरी लसणाचे सेवन करतात त्यांना कर्करोग होण्याची शक्यता 66.67 टक्के कमी असते.

मधुमेहाशी लढा -

मधुमेहींसाठी अनेक घरगुती उपाय आहेत. अंमलात आणल्यास हा आजार आटोक्यात येऊ शकतो. परंतु, हिमालयीन लसणामुळे मधुमेहाच्या पाकळ्यांनी मधुमेह आटोक्यात येतो हे अनेकांना माहिती नाही. तुम्हाला मधुमेह असेल तर लसणाच्या २-३ पाकळ्या खा. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

हृदयरोग आणि उच्च रक्तदाब बरा होतो -

हिमालय लसूण हृदयरोग दोन प्रकारे बरे करण्यास मदत करतो. एक, ते शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करते. अभ्यासानुसार, लसणाचे सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स 20 टक्क्यांनी कमी होतात. दुसरे म्हणजे, ते रक्ताची घनता कमी करून गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते. लसणाचे नियमित सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका 83 टक्क्यांनी कमी होतो, असे अभ्यासातून समोर आले आहे.

उच्च रक्तदाबाच्या बाबतीत, हिमालय लसणीचे सेवन स्नायूंना आराम देते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. लसणामध्ये हायड्रोजन सल्फाइड नावाचे एक संयुग शरीरातील सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी करण्यासाठी जबाबदार आहे.

(नोट - वरील बातमी संशोधकांनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. 'ई-सकाळ'सोबत या बातमीचा संबंध नाही. उपाय करताना एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com