लहान मुलांमध्‍ये डायरियाची साथ!

दिवसभरात तपासणीतील ७० टक्‍के बालकांना लागण
health diarrhea in children symptoms causes jalgaon
health diarrhea in children symptoms causes jalgaonsakal
Updated on

जळगाव : थंडी कमी होऊन उन्‍हाळ्याची चाहूल लागली आहे. सद्यःस्थितीत दुपारी उन्‍हाचे चटके, रात्री अन्‌ सकाळी थंडी जाणवत आहे. यातच अधूनमधून ढगाळ वातावरण होत आहे. या बदलत्‍या वातावरणाचा परिणाम म्हणून लहान मुलांमध्‍ये आजार निर्माण होत आहे. प्रामुख्‍याने उलट्या- जुलाबांचा (डायरिया) त्रास वाढला आहे. हवामानातील चढउतारांच्या पाश्र्वभूमीवर पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य समस्या दिसत आहेत. दिवसभरात तपासणीसाठी आलेल्या बालकांपैकी ७० टक्के बालकांना डायरियाची लक्षणे दिसत असल्याचे विविध बालरोग तज्ज्ञांनी सांगितले.

वातावरण बदलाचा परिणाम सर्वांवर दिसून येत असतो. परंतु, मुलांमध्‍ये बदलत्‍या वातावरणाचा परिणाम अधिक जाणवत असतो. यात आता हिवाळा जाऊन उन्‍हाळ्याची चाहूल लागली आहे. तीन-चार दिवसांपासून काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, पावसाची शक्‍यतादेखील वर्तविली जात आहे. परिणामी मुलांमध्‍ये डायरियाची लागण झाल्‍याचे दिसत आहे.

उलट्यांनी होते सुरवात

साधारणत: पाच वर्षांपर्यंत लहान बालकांमध्ये डायरिया दिसून येत आहे. यात पहिल्या दिवशी बाळाला उलट्या होतात व त्यानंतर पाण्यासारखे पातळ जुलाब लागतात आणि शरीरातील पाणी कमी होते. यात तीव्र स्‍वरूपाचा तापदेखील येत आहे. यामुळे लहान मुलांमध्‍ये अशक्तपणादेखील जाणवून येत आहे. पहिली उलटी होणे अर्थात ही डायरियाची सुरवात असल्‍याचे चित्र आहे. अधिक परिणाम झाल्‍यास मुलांना टायफाईडदेखील होण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com