esakal | श्वास घेण्यास त्रास होतोय? आरोग्य मंत्रालयाने सांगितली उपचार पद्धती

बोलून बातमी शोधा

श्वास घेण्यास त्रास होतोय? आरोग्य मंत्रालयाने सांगितली उपचार पद्धती

कोरोनावर घरीच उपचार करत असणाऱ्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर काय करायला हवं याची माहिती देण्यात आली आहे.

श्वास घेण्यास त्रास होतोय? आरोग्य मंत्रालयाने सांगितली उपचार पद्धती
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. वेगानं कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत असून गुरुवारी दिवसभरात देशात 3 लाख 32 हजारांहून अधिक रुग्ण सापडले. लाखो रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. अशा रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून काय काळजी घ्यायची ते सांगितलं आहे. कोरोनावर घरीच उपचार करत असणाऱ्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर काय करायला हवं याची माहिती देण्यात आली आहे. देशात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत असताना आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. डॉक्टरांनी ऑक्सिजनची पातळी स्वत: चेक करून रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे की नाही हे ठरवण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, यामध्ये रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो, ते कोरोनाचे एक लक्षण असून त्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि स्वस्थ वाटण्यासाठी पालथं झोपणं हे मदतीचं ठरतं. जर ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी असेल तर घरी असलेल्या रुग्णाने पोटावर पालथं झोपावं. यावेळी तोंड उघडं ठेवावं. तुम्हाला हे करत असताना चार किंवा पाच उशा लागतील. एक उशी मानेखाली, एक किंवा दोन छातीखाला आणि एक मांडीखाली आणि एक गुडघ्यांच्याखाली ठेवावी लागेल.

हेही वाचा: Corona Update: कहर! सलग तिसऱ्या दिवशी ३ लाखाहून अधिक नवे रुग्ण

पालथं झोपल्यानंतर तुम्हाला दर तीस मिनिटाला स्थिती बदलावी लागेल. यामध्ये पोटावर झोपल्यानंतर डाव्या कुशीवर आणि उजव्या कुशीवर झोपा. त्यानंतर पुन्हा झोपण्याआधी काही वेळ बसून राहा. त्यानंतर पुन्हा पोटावर पालथं झोपा. तुम्ही पालथं झोपत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा: हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजनमध्ये नेमका फरक काय?

कोणी टाळावं?

गर्भवती असलेल्या महिलांनी हे टाळावं.

DVT रक्ताच्या गाठींचा त्रास असणाऱ्यांनी करू नये.

हृदयाचा विकार असल्यास अशा अवस्थेत जास्त काळ राहू नये.

femur किंवा pelvic fractures असलेल्यांनी हे करू नये.

काय काळजी घ्यायची?

याशिवाय जेवणानंतर तासाभरात करू नये

जितका वेळ सहन करता येतंय तेवढंच करावं

वेगवेगळ्या अवस्थेत दिवसभरात 16 तासांपर्यंत करता येईल

तुम्हाला दुखापत किंवा प्रेशर असेल तर त्याकडे लक्ष द्या.