मनुके आणि मधाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर; माहित करून घ्या महत्त्वाचे फायदे

honey
honey

औरंगाबाद: मनुके आणि मध आरोग्यासाठी महत्वाचे आणि फायदेशीर असतात. हे त्यांच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या गुणांसाठी ओळखले जातात. परंतु त्यांचे एकत्र सेवन केल्याने आरोग्यासाठी भरपूर फायदे होऊ शकतात. पचनसंस्था चांगली होण्यासाठीही मनुका फायदेशीर ठरू शकतो.

मनुक्यांचे सेवन आरोग्यासाठी उत्तम आहेच परंतु मनुक्यांमध्ये मध घालून त्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा दुप्पट होऊ शकतो. नेमके यांच्या सेवनाचे आपल्याला काय काय फायदे होतात ते पाहूया...

1. कमकुवतपणा करण्यास मदत-
मनुके आणि मधाचे एकत्र सेवन केल्यास शरीरिक ताकद वाढण्यास मदत होते. जर रोज काही दिवस मध आणि मनुका खाल्ल्याने तुम्हाला स्वतःमध्ये बदल दिसू लागतील.

2. शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढू शकतं-
मनुक्यांचे सेवन मधासोबत केल्याने बरेच फायदे होतात. खासकरून पुरषांमधील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढण्यास या दोन्हींच्या मिश्रणाचे सेवन खूपच फायदेशीर ठरतं. मनुके आणि मधाकडे एक प्रकारचं बुस्टींग फूड म्हणून पाहिलं जातं.

3. स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते-
काही लोकांमध्ये स्पर्म काउंटच्या अडचणी दिसून येतात. यावर मात करण्यासाठी रोज मध आणि मनुके खाल्ले तर त्याचा फायदा होऊ शकतो. रात्री झोपण्यापुर्वी मनुक्यांसोबत मध घेतल्याने स्पर्म काउंट वाढण्यास मदत होऊ शकते.

4. प्रोस्टेट कॅन्सर-
असं मानलं जातं की मनुके आणि मधांमध्ये कॅन्सरविरोधी अनेक गुण असतात. पुरुषांत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक असतो. एका अभ्यासानुसार मध आणि मनुक्यांमध्ये कॅन्सर अॅन्टीइलेमेंट्स असतात. त्यामुळे मनुके आणि मधाच्या सेवनाचे अनेक फायदे होऊ शकतात. 

( Disclaimer: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com