डोकेदुखीने हैराण आहात? घरगुती उपायांनी झटपट दूर करा मायग्रेनचा त्रास

health news migraine treatment home remedies
health news migraine treatment home remedies
Updated on

सध्याच्या काळात प्रत्येक जण घड्याळाच्या काट्यावर चालत आहे. ऑफिसमधील काम, घर, कुटुंब यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या नादात अनेकांचं स्वत: आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. सतत होणारी धावपळ आणि कामाचा ताण याचा सगळा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. परिणामी, अनेक जण डोकेदुखी, अंगदुखी किंवा अन्य शारीरिक व्याधींनी त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं.  यामध्येच गेल्या काही काळापासून अनेक जण मायग्रेन या समस्येने त्रस्त आहे. अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते पन्नाशीच्या आसपास असलेल्या व्यक्तींपर्यंत अनेकांमध्ये ही समस्या असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये बऱ्याचदा उन्हात गेल्यामुळे किंवा सतत विचार केल्यामुळे मायग्रेनचा त्रास जास्त जाणवतो. अनेक डॉक्टर किंवा वैद्यकीय उपचार केल्यानंतरही हा त्रास काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काही घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरु शकतं. म्हणूनच मायग्रेनचा त्रास कमी करणारे काही घरगुती उपाय कोणते ते पाहुयात.

मायग्रेन एक न्युरोलॉजिकल कंडिशन आहे. या मायग्रेनला अर्धशिशी असंदेखील म्हटलं जातं. मायग्रेनमध्ये प्रचंड डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. यात अनेकांचं डोकं दोन दोन दिवस सलग दुखतं. काहींना डोकेदुखीसोबतच चक्कर येणे, उलटी होणे असा त्रासदेखील जाणवतो.

मायग्रेन म्हणजे नेमकं काय?
 

मायग्रेनचा त्रास नेमका का होतो  या मागचं ठोस कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, अनेक डॉक्टरांच्या मते, सतत धावपळ किंवा मानसिक ताणामुळे हा त्रास निर्माण होतो. तसंच मेंदूमधील केमिकल सेरोटोनिनची मात्र जेव्हा कमी होते. त्यावेळी मायग्रेन ट्रिगर होतो असं म्हटलं जातं. तसंच प्रखर सूर्यप्रकाश, प्रचंड उकाडा, डिहायड्रेशन, हर्मोनिल चेंज, गरोदरपणा, मासिक पाळी, ताण, कर्कश आवाज, अपूर्ण झोप, मद्यपान करणे, धुम्रपान करणे अशा अनेक गोष्टींमुळे मायग्रेनचा त्रास होतो.

मायग्रेनवरील घरगुती उपाय

१. सगळ्या प्रथम तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करा. पुरेशी झोप, योग्य आहार यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या.

२. ज्यावेळी मायग्रेनचा त्रास होईल त्यावेळी चार बर्फाचे खडे रुमालात बांधून त्याने डोक्यावर शेक द्या. १५ मिनिटे हा प्रयोग केल्यास नक्कीच आराम मिळेल.

३.  रोज सकाळी अनेशा पोटी एक गुळाचा खडा खावा आणि त्यावर गार दूध प्यावे.

४. आल्याचा एक लहानसा तुकडा दाताखाली ठेवून किंचित दाबावा आणि त्यातून येणारा आल्याचा रस हळूहळू प्यावा.

५. दालचिनीची पेस्ट करुन ही पेस्ट कपाळावर लावावी.

६. लवंगाची पूड, चिमुटभर मीठ दुधासोबत सेवन करावं.

७. प्रखर उन्ह किंवा सतत लाइटच्या उजेडात राहू नका.

८. शक्यतो वर्दळ, गोंधळ, कर्कश आवाज अशा ठिकाणांपासून दूर रहा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com