Hemorrhoids Symptoms : मूळव्याधीतही होमिओपॅथीचा सम्यक विचार; 'या' लोकांना ही व्याधी उद्भवण्याची शक्यता जास्त!

मूळव्याध (Hemorrhoids Symptoms) ही समस्या अन्य शास्त्राआधारे शेवटी शस्त्रक्रियेद्वारे बरी करण्याचा प्रयत्न केला जातो.
Hemorrhoids Symptoms
Hemorrhoids Symptomsesakal
Summary

मूळव्याधीच्या या निरनिराळ्या प्रकारांमध्ये होमिओपॅथीद्वारे उपचार करत असता खूप निराळ्या प्रकारे विचार केला जातो.

-डॉ. विश्वजित मानकर, चिपळूण

मूळव्याध (Hemorrhoids Symptoms) ही समस्या अन्य शास्त्राआधारे शेवटी शस्त्रक्रियेद्वारे बरी करण्याचा प्रयत्न केला जातो. बहुतांश रुग्णांमध्ये काही कालावधीतच ही समस्या पुन्हा उद्भवते. होमिओपॅथी (Homeopathy) शास्त्राच्या आधारे उपचार करताना त्याचा निराळ्याप्रकारे विचार केला जातो. वेदनादायी मूळव्याध व वेदनारहित मूळव्याध, रक्तस्राव होणारे व रक्तस्रावाशिवाय होणारे मूळव्याध, गुदद्वाराबाहेर व गुदद्वाराअंतर्गत अशा स्वरूपाचे वर्गीकरण सामान्यपणे केले जाते आणि त्यानुरूप औषधयोजना ठरवली जाते.

Hemorrhoids Symptoms
पिंपळपार : लहानपणीचे दिवस आठवले की, मन अजूनही 'त्या' रम्य आठवणींचा मागोवा घेऊ लागतं!

पचनसंस्थेतील आतड्यांचा शेवटचा भाग म्हणजे गुदद्वार. मूळव्याधीची जी अनेक कारणे आहेत, त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आहार. सामान्यपणे खूप तिखट, मसालेदार पदार्थांचे सातत्याने सेवन मूळव्याधाच्या कारणांपैकी एक आहे. आपल्याकडे बाळंतपणामध्ये लाल तिखट अथवा हिरवी मिरची आहारामध्ये पथ्य म्हणून न वापरता त्याऐवजी काळीमिरीचा वापर केला जातो. बहुतांश स्त्री रुग्णांमध्ये काळे मीठ सेवन हे मूळव्याधीस कारणीभूत ठरते. त्याचप्रमाणे ज्यांना तासन्‌तास एका ठिकाणी आणि उष्ण वातावरणात बसून काम करावे लागते उदाहरणार्थ ड्रायव्हर, कंडक्टर अशा लोकांना ही व्याधी उद्भवण्याची शक्यता जास्त असते.

मूळव्याधीच्या या निरनिराळ्या प्रकारांमध्ये होमिओपॅथीद्वारे उपचार करत असता खूप निराळ्या प्रकारे विचार केला जातो. उदाहरणार्थ, वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र औषधयोजना आहे. रक्तस्राव असणे आणि नसणे, गुदद्वाराबाहेरील कोंब आणि गुदद्वाराअंतर्गत असणारे मूळव्याध , मूळव्याधातील वेदनांचे क्षमन थंडोपचाराने होते अथवा उष्णोपचाराने होते यांचा विचार करून औषधयोजना केली जाते. या व्याधीमध्ये उपचार करत असताना रुग्णाला टाळणे शक्य नाही, अशा काही मूलभूत गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्या योगे निराळे उपाय योजावे लागतात. उदाहरणार्थ, ड्रायव्हर अथवा एसटीचे कंडक्टर यांना सातत्याने रेक्सिनच्या सीटवर बसून सलग काही तासांचा प्रवास करावा लागतो आणि ही गोष्ट टाळणे त्यांना अशक्य असते.

Hemorrhoids Symptoms
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात; बालमानस शास्त्राची जाण नसल्यामुळं उद्भवू शकतात समस्या!

आहारामधील मूळव्याधकारक कारणे विचारपूर्वक बाजूला करणे अत्यावश्यक असते. मूळव्याधामध्ये असणाऱ्या वेदना या शौच, शौचाच्या सुरवातीस, शौच होत असताना प्रथमपासून अखेरपर्यंत अथवा शौचानंतर उद्भवतात अथवा वाढतात. कधी त्या संपूर्ण दिवसभर जाणवत असतात. वेदनांच्या बाबतीमध्ये शारीरिक अवस्थांचा स्वतंत्र विचार केला जातो. उदाहरणार्थ, वेदना झोपलेल्या अवस्थेत असता, बसलेल्या अवस्थेत असता, उभे असता, चालताना यापैकी कोणत्या शारीरिक अवस्थेत वेदना वाढतात. याचा औषधयोजना करताना विचार केला जातो आणि ज्या अवस्थेत वेदना वाढतात तिथे स्वतंत्र औषधयोजना आहे.

या बरोबर वेदनांचे स्वरूप वेदना टोचल्यासारख्या आहे, कापल्यासारख्या आहेत, गुदद्वाराची जळजळ होते आणि या सर्व वेदना मल केवळ कठीण असतानाच होतात किंवा सामान्य मल बाहेर येतानाही या वेदना उद्भवतात इतका बारकावा अभ्यासणे गरजेचे ठरते. मूळव्याधीचे कोंब कशा प्रकारचे आहेत, हे पाहणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, कोंब मऊ आहेत, स्पर्शाला कठीण लागतात, त्यांचा आकार मोठा आहे अथवा लहान आहे, द्राक्षाच्या घडाप्रमाणे आहे, कोंबांचा रंग निळसर अथवा जांभळा आहे.

Hemorrhoids Symptoms
Chiplun Datta Temple : शांत...शांत...संवादासाठी श्रीक्षेत्र अवधूतवन!

मूळव्याधीचा त्रास स्त्री रुग्णांमध्ये मासिक पाळी येण्यापूर्वी, सुरू असताना, येऊन गेल्यानंतर किंवा अनैसर्गिकरित्या अचानकपणे थांबली असता स्त्रीच्या बाळंतपणाच्या काळामध्ये सदर व्याधी उद्भवते. मूळव्याधीत छातीतील धडधड आलटून पालटून वाढते. मूळव्याधीच्या व्याधीसोबत कंबरदुखी असते. अशा बाबींचा विचारही होमिओपॅथी शास्त्र करते, हे वाचकांना आश्चर्य वाटेल. औषधोयजना करत असताना याहीपेक्षा सखोल मिमांसा करणे गरजेचे ठरते. होमिओपॅथी शास्त्र किती वेगळेपणाने विचार करते हे यावरून अधोरेखित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com