Heat Stroke Symptoms : उष्माघात टाळण्यासाठी 'अशी' घ्या खबरदारी; चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचाही घ्या सल्ला

वाढते तापमान, हवेतील आर्द्रता यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.
Heat Stroke Symptoms
Heat Stroke Symptoms esakal
Summary

शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे, ही उष्माघाताची लक्षणे आहेत.

Heat Stroke Symptoms : वाढते तापमान, हवेतील आर्द्रता यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. चक्कर येणे, उलटी व मळमळ, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे, ही उष्माघाताची लक्षणे आहेत. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी.

काय करावे? : • तहान लागलेली नसली, तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. • हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. • घराबाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा. • प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी. • उन्हात काम करताना डोक्यावर टोपी, पांढरा रुमाल, छत्री घ्यावी. ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकावा. • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घ्यावे, लस्सी/ताक/ कैरीचे पन्हे/लिंबू प्यावे. • अशक्तपणा (Weakness), स्थूलपणा, डोकेदुखी, सतत घाम आदींमुळे उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

• गुरांना/पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे. पुरेसे पाणी द्यावे. • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. • पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. • बाहेर उन्हात काम करीत असताना थोड्या-थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी. • गर्भवती माता, कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.

Heat Stroke Symptoms
Online Shopping : ऑनलाइन शॉपिंग करताय? मग सावध राहा, अन्यथा होईल मोठं नुकसान

• रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत. • जागोजागी पाणपोईची सुविधा करावी. • काँक्रीट घराच्या छतावर पांढरा रंग द्यावा. • टीन पत्र्याच्या छतावर गवताची पेंढी / धान्याचा कडबा यांचे आच्छादन करावे. • छतावरील पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाक्या गोणपाटाच्या सहायाने झाकाव्यात.

Heat Stroke Symptoms
Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

काय करू नये?

• लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. • दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. • शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. • उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. • मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेऊ नये. त्यामुळे डीहायड्रेशन होते. • उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. • ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com