सुदृढ भारतीयांचे वजन 5 किलोने वाढले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचा अहवाल

भाग्यश्री भुवड
Thursday, 1 October 2020

नुकतेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सुदृढ भारतीयांचे वजन पाच किलोने वाढले आहे. त्यानुसारच पुरुषाचे वजन 65 तर स्त्रियांचे वजन 55 किलो निश्चित केले आहे.

मुंबई: माणसाचे वय, उंची यानुसार वजनाचे प्रमाण निश्चित केले आहे. मात्र ठराविक वयानंतर सुदृढ व्यक्तीचे वय किती असावे याचेही गणित निश्चित केले आहे. त्यानुसार आतापर्यंत प्रत्येक सुदृढ भारतीय स्त्री आणि पुरुषाचे वजन हे अनुक्रमे 50 आणि 60 किलो असणे अपेक्षित होते. मात्र नुकतेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सुदृढ भारतीयांचे वजन पाच किलोने वाढले आहे. त्यानुसारच पुरुषाचे वजन 65 तर स्त्रियांचे वजन 55 किलो निश्चित केले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (एनआयएन)या सरकारी संस्थेने 1989 मध्ये सुदृढ भारतीयांचे वजन किती असावे यासंदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यानुसार भारतातील 20 ते 39 वयोगटातील पुरुषाचे वजन हे 60 किलो असल्यास तो सुदृढ समजण्यात येईल. तर याच वयोगटातील महिलांचे वजन हे 50 किलो असणे अपेक्षित होते. मात्र एनआयएनने 2010 मध्ये पुन्हा या अभ्यासाला सुरुवात केली. हे सर्व्हेक्षण नुकतेच संपले असून त्याचा अहवाल एनआयएनने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

 देशातील 10 राज्यांमधील ग्रामीण भागामध्ये केला. यासाठी त्यांनी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, नॅशनल न्यूट्रिशन मॉनिटरिंग ब्युरो, जागतिक आरोग्य संघटना इंडियन अकेडमी ऑफ पेडिऍट्रिक या संस्थानी केलेल्या सर्व्हेक्षणाच्या माहितीचाही यासाठी वापर केला. सुदृढ भारतीयांचे वजन ठरवण्यासाठी 100 मागे 95 जण गृहीत धरण्यात आले. यानुसार सुदृढ भारतीयांचे वजन ठरवताना वयाची मर्यादाही बदलण्यात आली. नव्याने केलेल्या या सर्व्हेक्षणानुसार सुदृढ भारतीय व्यक्तीचे वय हे 19 ते 39 वर्ष इतके ग्राह्य धरण्यात आले. त्यानुसार सुदृढ भारतीय पुरुषाचे वजन हे 60 वरून 65 किलो तर महिलांचे वजन 50 वरून 55 किलो करण्यात आले आहे. नव्या सर्व्हेक्षणानुसार सुदृढ भारतीय पुरुष आणि महिलांचे वजन हे पाच किलोने वाढले आहे.

सुदृढ भारतीय व्यक्तीप्रमाणे सुदृढ बालकांचे वजनही या सर्वेक्षणाद्वारे निश्चित करण्यात आले. यामध्ये 1 ते 3 वर्ष बालकांचे वजन 11.7 किलो, 4 ते 6 वर्ष बालक 18.3 किलो, 7 ते 9 वर्ष बाळ 25.3 किलो तसेच 10 ते 12 वर्षाच्या मुलाचे वजन 34.9 किलो तर मुलीचे वजन 36.9 किलो, 13 ते 15 वर्षाच्या मुलाचे वजन 50.4 किलो तर मुलीचे वजन 49.6 किलो त्याचप्रमाणे 16 ते 18 वर्षाच्या तरुणाचे मुलाचे वजन 64.4 किलो तर मुलीचे वजन 55.7 किलो इतके निश्चित केले आहे. 

-----------------

(संपादनः पूजा विचारे)

Healthy Indians gained 5 kg according report by National Institute of Nutrition


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy Indians gained 5 kg according report by National Institute of Nutrition