वारंवार पोट दुखतंय?; जाणून घ्या हेपेटायटीसचे प्रकार,लक्षणे

किरकोळ दुखणं समजून 'या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
stomach-pain
stomach-pain

हेपेटायटीसला Hepatitis सायलेंट किलर म्हणून ओळखलं जातं. कावीळची लक्षणं पटकन दिसून येत नाहीत. मात्र, योग्यवेळी तपासणी किंवा उपचार केले नाहीत. तर पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. हेपेटायटीसकडे दुर्लक्ष केल्यास लिव्हर सिरोसिस, कर्करोग किंवा यकृत निकामी होणे यासारखी जीवघेणे आजारही उद्भवू शकतात. म्हणूनच, या आजारांपासून दूस राहायचं असेल तर हेपेटायटीसच्या रूग्णांनी दर सहा महिन्यांतून एकदा नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. त्यापूर्वी आपण हेपेटायटीसचे प्रकार व लक्षणे कोणती ते पाहुयात. (Hepatitis-symptoms-causes-health-care-ssj93)

हेपेटायटीसचे प्रकार -

१. हेपेटायटीस ए -

हेपेटायटीस झालेल्या व्यक्तीच्या मलामुळे संक्रमित झालेलं दुषित पाणी किंवा अन्न सेवन केल्यामुळे हेपेटायटीस ए होतो.

२. हेपेटायटीस बी -

हेपेटायटीस बी हा अस्वच्छ इंजक्शन, असुरक्षित संभोग यासाख्या समस्यांमुळे होऊ शकतो. तसंच योनीतून द्रव,रक्त आणि प्रसूती दरम्यान आईकडून नवजात बाळासदेखील याचं संक्रमण होऊ शकतं.

३. हेपेटायटीस सी -

जेव्हा एखाद्याचा हेपेटायटीस सी विषाणूचा संसर्ग झालेल्या दुसर्‍या व्यक्तीशी संपर्क होतो. तेव्हा हेपेटायटीस सी ची लागण होते.

४. हेपेटायटीस डी -

रक्त, लाळ, वीर्य आणि योनिमार्गासारख्या संसर्गजन्य शरीरातील द्रव शरीराच्या ऊतींशी संपर्क साधतात तेव्हा हेपेटायटीस डी चा प्रसार होतो.

५. हेपेटायटीस ई -

हेपेटायटीस ई हा मलाद्वारे संक्रमित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो.

हेपेटायटीसची लक्षणे -

थकवा

मळमळ

उलट्या

पोटदुखी

भूक न लागणे

गडद लघवी होणे

सांधेदुखी

त्वचा पिवळसर होणे

सांधेदुखी

दरम्यान, ब-याच लोकांना हेपेटायटीस विषयी माहिती नसते आणि त्यामुळे नंतरच्या आयुष्यात त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. हेपेटायटीस हा एक सायलेंट किलर असून हेपेटायटीस बी आणि सी मध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. आणि, नकळतपणे त्याचा प्रसार होतो. वेळीच तपासणी केल्याने हेपेटायटीसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींचे संपूर्ण मूल्यांकन आणि उपचार केले जातात आणि यकृत रोगाच्या वाढीस सिरोसिस, हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा आणि संबंधित विकृती आणि मृत्यूचा प्रतिबंध होतो, असं पुण्याच्या अपोलो डायग्नोस्टिक्सच्या सल्लागार पॅथॉलॉजिस्ट डॉ. कीर्ती प्रकाश कोटला यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com