esakal | बाळ आजारी पडल्यास 'हे' घरगुती उपचार ठरतील फायदेशीर...
sakal

बोलून बातमी शोधा

baby.

बाळाला होणारा हा त्रास आई वडिलांना बघवत नाही, त्यात तुम्ही ही असू शकाल बरोबर ना...तेच गावाकडे अशा आजारांवर करण्यात येणारे घरगुती उपचार जादुई काम करतात. इथे काही घरगुती उपचार दिले आहेत. ज्याचा तुम्हाला तुमच्या बाळासाठी उपयोग होईल. शून्य ते एक वर्षांच्या बाळासाठी हे काही घरगुती उपचार आपण नक्की करू शकता. या उपचारांनी बाळाला अजिबात धोका होत नाही. त्या घरगुती उपायांबद्दल आज आपण जाणून घेऊयात.   

बाळ आजारी पडल्यास 'हे' घरगुती उपचार ठरतील फायदेशीर...

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : सध्या अनेकजण नोकरीनिमित्त गावाकडील लोक शहराकडे वास्तव्यास जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जेष्ठ सदस्य गावाकडेच राहायला प्राधान्य देतात. नोकरीमुळे या लोकांना आपल्या मुलांना सोबत घेऊनच राहावं लागत. परंतु शहरात येऊन राहिलेल्या आईवडिलांना त्यांचे मुलं लहान असेल तर त्यांना बाळाला डेककेअर मध्ये सोडावे लागतात.

कधी कधी बाळ आजारी पडल्यास त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे गावाकडील आपल्या जेष्ठ मंडळींची आठवण त्यांना येतच असते. त्या परिस्थितीत काय करावे ही चिंता त्यांना सतावते, साहजिकच बाळाला होणारा हा त्रास आई वडिलांना बघवत नाही, त्यात तुम्ही ही असू शकाल बरोबर ना...तेच गावाकडे अशा आजारांवर करण्यात येणारे घरगुती उपचार जादुई काम करतात. इथे काही घरगुती उपचार दिले आहेत. ज्याचा तुम्हाला तुमच्या बाळासाठी उपयोग होईल. शून्य ते एक वर्षांच्या बाळासाठी हे काही घरगुती उपचार आपण नक्की करू शकता. या उपचारांनी बाळाला अजिबात धोका होत नाही. त्या घरगुती उपायांबद्दल आज आपण जाणून घेऊयात.   

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची, म्हणजेच आई-बाबा, काका-काकू, आजी-आजोबा यामुळे घर भरल्या भरल्या सारखं वाटायचं. त्यामुळे कोणत्याही गोष्टींसाठी कधीही बाहेरच्या माणसांची गरजच पडत नव्हती. त्यामुळे त्या कुटुंबातील सर्व निर्णय जेष्ठ मंडळी घेत असे, म्हणजे घरातील लहान बाळापासून ते मोठ्यापर्यंत यांना काहीही झालं तरी आपल्या घरातील आजी त्यावर तोडगा काढत असत. म्हणजेच पूर्वी लहान बाळाला काहीही झालं तरी त्या बाळाला दवाखान्यात न नेता घरगुती उपाय करून त्या बाळाचे आजार दूर करत होत्या. आता याचे प्रमाण खूपच कमी झालं आहे.

आता नोकरदारवर्गांची संख्या वाढल्यामुळे जो तो आपलं गाव सोडून शहराकडे आपली छोटी फॅमिली सोबत राहत आहे. त्यामुळे या शहरी लोकांना गावाकडील घरगुती उपाय काय आणि ते कसे केले जातात, त्या बद्दल काही माहितीच नाही. त्यामुळे शहरातील लोक बाळाला जरा काहीतरी झालं तरी लगेच डॉक्टरांकडे धाव घेतात. पण बाळाला काही झालं तर तुम्ही ग्रामीण भागांप्रमाणे घरगुती उपाय करू शकता, ते घरगुती उपाय करून बाळाचा त्रास कमी करता येतो. 

शहरातील कुटुंबासोबत कुणी जाणकार व्यक्ती सोबत राहत नाही, यामुळे बाळ आजरी पडल्यास बाळाचे आईवडील लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतात आणि  पैसे खर्च करतात. त्यामुळे शहरातील बाळ ही खूपच नाजूक बनली जात आहेत, तेच गावाकडची लहान बाळ अगदी ताकतवान, हेल्दी, खेळकर, बिंदास्त अशी असतात.

बदलत्या वातावरणामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील बाळांमध्ये बदल पडलेला असतो, यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील लहान मुले यात खूप फरक असतो असे जाणकार लोक सांगतात. जर बाळांमध्ये काही धोक्याची लक्षणे दिसली तर त्याकडे लक्ष असू द्या. जर घरगुती उपचारांची तुमच्या बाळाला बरे वाटण्यासाठी काही मदत झाली नाही तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या. 

बाळाला​ सर्दी झाली असल्यास... 

लहान बाळाला सर्दी झाली तर बाळाच्या टाळूवर(केसांवर) हळद लावून टोपी बांधा, असे केल्यास बाळाला सर्दी झाल्यावर होणारा त्रास कमी होईल. 

बाळाला​ खोकला झाला असल्यास... 

लहान बाळाला सर्दी झाल्यास लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याला दोऱ्यात ओवून बाळाच्या गळ्यात बांधणे आणि बिबा पायाला लावतात. त्याने काही दिवसांतच सर्दी कमी होती. तसेच जेणेकरून सर्दीचा त्रास लहान बाळांना होणार नाही.  

बाळाची मान अवघडली असल्यास/ बाळ अवटाळल्यावर... 

लहान बाळाची मान अवघडली असल्यास आजीच्या  नऊवारी साडीच्या पदरामध्ये लहान बाळाला झोपवून त्या पदराच्या दोन्हीबाजूने पकडून गोल फिरवले जात. त्यामुळे बाळाची अवघडलेली मान बरी होते. 

बाळाला दात येताना सुळसुळत असल्यास... 

लहान बाळांचे दात येताना सुळसुळत असल्यास त्या बाळांना डिकमल हात, पाय आणि डोक्याला लावा. जेणेकरून नवीन दात येताना लहान बाळांना त्रास होणार नाही.

बाळाला कावीळ झाल्यास... 

बाळाला कावीळ झाल्यास कोवळ्या उन्हात घेऊन बसा, यामुळे कावीळ बरी होईल. 

बाळाचे पोट साफ न झाल्यास... 

बाळाचे पोट साफ न झाल्यास बाळाच्या आईने ओवा चावून बाळाच्या तोंडात फुंकर मारणे, असे केल्यास बाळाचे पोट साफ होते. 

टाळू पडल्यावर... 

बाळाचे टाळू पडले असेल तर टाळूवर तेलात बुडवलेला कापसाचा बोळा ठेवा.  

बाळ सतत किरकिर करत असल्यास... 

बाजारात काळे बोळ म्हणजेच (अप्पू ) मिळतात ते दुधात घालून बाळाला पिऊ घाला.  

बाळाला पोटातले आल्यावर... 

बाळाला पोटातले आल्यावर नाळ उगळून घ्या आणि दुध, पाण्यात घालून पिऊ घालणे. 

loading image
go to top