esakal | मायग्रेनचा त्रास होतोय? मग 'हे' घरगुती उपाय करा अन् त्वरीत आराम मिळवा
sakal

बोलून बातमी शोधा

Migraine

मायग्रेनचा त्रास होतोय? मग 'हे' घरगुती उपाय करा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : डोकेदुखी (headache) ही एक सामान्य समस्या आहे. डोक सौम्य दुखत असेल तर आपण दुर्लक्ष करतो. पण, तीव्र डोकेदुखी असेल तर कुठल्याही कामात लक्ष केंद्रीत करू शकत नाही. ही डोकेदुखी अनेक प्रकारची असू शकते. त्यापैकी एक म्हणजे मायग्रेन (migraine). हे डोक्याच्या एका भागावर परिणाम करते. त्यामुळे असह्य वेदना होतात. ही गंभीर समस्या असून आपल्याला दोन ते तीन याचा त्रास होऊ शकतो. या दुखण्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय (home remedies for migraine) करू शकता. (home remedies to cure migraine)

हेही वाचा: मेंटल डिस्टंसिंग म्हणजे नेमकं काय?

मायग्रेनची लक्षणे -

मायग्रेन उद्भवण्यापूर्वी तुम्हाला त्याची काही लक्षणं दिसतात. डोळ्यांसमोर अस्पष्ट आणि लहान डाग दिसू शकतात. त्यानंतर काही वेळाने वेदन सुरू होते. कोणाला मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात. साधारण मायग्रेन हे २-३ दिवसांपर्यंत असू शकतो.

काही लोकांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे सेवन किंवा सल्फेटची मात्रा जास्त असलेल्या अशा पदार्थांचे सेवन केल्याने ही समस्या उद्भवू शकते. अशा पदार्थांमुळे आपल्या रक्तातील कोशिका वाढतात आणि मेंदूत रक्त प्रवाह वाढतो.

मायग्रेनवर उपाय

जायफळ पेस्ट लावा -

जायफळ एक मसाला असून हे औषधी गुणधर्मांची खाण आहे, जी डोकेदुखीमध्ये आराम देते. त्याची पावडर पाणी किंवा कच्च्या दुधात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट तुमच्या कपाळावर आणि कानाच्या मागे लावा. हे मालिश केल्यास आपल्याला त्वरित आराम देखील मिळेल.

पेपरमिंट तेल आणि चहा -

पेपरमिंट तेलाचा सुगंध आपल्याला डोकेदुखीपासून आराम देईल. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म मज्जातंतूंना शांत करतात. इतकेच नाही तर वेदनामुळे मळमळ आणि उलट्या टाळण्यासही मदत होते. आपण पेपरमिंट तेलाचा वास घेऊ शकता किंवा आपल्या बोटांवर तेल घेऊन कपाळावर मालिश करू शकता. आल्याच्या चहाशिवाय आपण डोकेदुखी दरम्यान पेपरमिंट चहा देखील पिऊ शकता.

तीळाचे तेल -

जर तुम्हाला मायग्रेनच्या तीव्र वेदना जाणवत असेल तर आपल्या नाकात तिळाच्या तेलाचे काही थेंब घाला. त्यामुळे मायग्रेनसोबतच मानसिक ताणतणाव देखील दूर होतील. यासाठी आपण दिवसातून एकदा आपल्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये तिळ तेलाचे तीन थेंब टाकू शकता. तीळ तेलामुळे आपल्या मेंदूत दबाव निर्माण करणारा वायू बाहेर पडतो आणि आपले शरीराला आराम देते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image