Vomit Feel! फॉलो करा आठ टिप्स, मिळेल त्वरित आराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vomiting

काही टिप्सचा वापर करून तुम्ही उलटी होण्यास रोखू शकता.

Vomit Feel! फॉलो करा आठ टिप्स, मिळेल त्वरित आराम

आपण सर्व जण नेहमीच बाहेरून वेगवेगळ्या ठिकाणाहून काहीतरी खातो. आपलं कधी स्टॉलवरून, कधी कँटीनमधून, कधी छोट्या दुकानातून किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि ढाब्यातून खाणं सुरुच असतं. या सर्व ठिकाणी स्वच्छतेला जरा कमी प्राधान्य देत आपण आपल्या चवीमुळे सर्व काही खातो.

जेव्हा या अन्नामुळे पोट दुखतं आणि उलटी झाल्यासारखं वाटतं तेव्हा जिभेवर नियंत्रण ठेवायला हवं होतं, असं समजतं. त्याचबरोबर गाडी किंवा बसमधून मुलांनी थोडा जास्त वेळ प्रवास केला तर त्यांना उलटी झाल्यासारखं वाटतं. उलटी होण्यापूर्वी मळमळ आणि अॅसिडिटीची भावना केवळ हेच दर्शवते की कदाचित आता उलट्या होणार आहेत. यावेळी काही टिप्सचा वापर करून तुम्ही उलटी होण्यास रोखू शकता.

- उलटीपासून बचाव करण्यासाठी आलं खाणं फायदेशीर ठरतं. आलं हलकेच पाण्यात गरम करूनही पिऊ शकता.

- लिंबू चोखण्यामुळे उलट्या थांबण्यास मदत होते.

- एक कप कोमट पाण्यात एक चमचा लवंग घालून उकळवा आणि ते पाणी गाळून प्या. प्रवासात होणाऱ्या उलट्यांपासून आराम मिळतो.

- जेव्हा आपल्याला उलट्या झाल्यासारखे वाटते तेव्हा पाणी किंवा लिंबूपाणी प्या. हे हळूहळू आरामात प्या, एकाच वेळी जास्त प्यायल्याने उलट्या होऊ शकतात.

- दीर्घ श्वास घ्या आणि काही चांगल्या गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न करा. प्रवासादरम्यान जेव्हा मळमळ जाणवते तेव्हा ही पद्धत खूप उपयोगी ठरते.

- संत्र्याचा रस प्यायल्याने किंवा संत्री खाल्ल्याने उलटी झाल्यासारखे वाटणे बंद होते.

- एक कप पाण्यात उकळलेली एक चमचा बडीशेप 10 मिनिटे पिल्यानेही उलट्या होण्यापासून बचाव होतो.

- मीठ आणि साखरेचे पाणी प्यायल्याने तुम्हाला आराम वाटेल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

टॅग्स :health news