किडनी स्टोनपासून मुक्त होण्यास मदत करते कुलथीची डाळ

horse gram helps to get rid of kidney stone.jpg
horse gram helps to get rid of kidney stone.jpg

पुणे : प्रोटीनसह अनेक मिनरल्स आणि विटामिन्स समृद्ध असलेल्या कुलथी डाळ हरभरा, मूग, मसूर आणि राजमापेक्षा जास्त फायदेशीर आहे. तुम्ही यापूर्वी त्याचे नाव ऐकले नसेल परंतु आयुर्वेदाच्या जगात त्याचे स्थान उच्च आहे. कुलथीबद्दल असे म्हणतात की पृथ्वीवर वाढणार्‍या सर्व डाळींपेक्षा हे पौष्टिक आहे. कुलथीला इंग्रजीमध्ये हॉर्स ग्राम (Horse gram) असे म्हणतात. हा प्राण्यांसाठी चारा म्हणून अधिक वापरला जातो पण आयुर्वेदानुसार हे मानवांसाठीही खूप फायदेशीर आहे. प्रोटीनव्यतिरिक्त, कुलथीमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात, जे आपल्याला निरोगी बनवतात.

किडनी स्टोनची समस्या असल्यास कुलथी डाळ घेण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या शरीरात कॅल्शियमची एकाग्रता वाढल्यास स्टोन होण्याची शक्यता वाढते. किडनी स्टोन देखील या कारणामुळे होतो. कुलथी डाळमध्ये बरेच अँटी-ऑक्सिडंट्स आहेत जे आपल्या शरीरातून गोठलेले कॅल्शियम बाहेर काढण्याचे काम करतात. किडनी स्टोनवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केल्यास पीडितेला कुलथीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कुलथी डाळ, कुलथी पाणी आणि कुलथी पावडर आपल्या आहारात घेऊ शकता. परंतु वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे करू नका.

कुलथीचे सेवन तुमचे पचन सुधारते, वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करते. कुलथीमध्ये फ्लाव्हनाइड्स आणि पॉलीफेनॉल नावाची दोन उत्कृष्ट संयुगे असतात, जी लिव्हर निरोगी ठेवतात. पोटसुद्धा स्वच्छ राहते आणि तुम्हाला बद्धकोष्ठता सारखी समस्यासुद्धा उदभवत नाही. डायबिटीजमुळे पीडित लोकांसाठीही कुलथी डाळी फायदेशीर आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने एका संशोधनात असे आढळले की कुलथी डाळच्या सेवनाने इन्सुलिन संतुलित होते, ज्यामुळे शुगर नियंत्रित होते.

कुलथी नैसर्गिकरित्या फॅट बर्नर म्हणून कार्य करते. याचा उपयोग करून तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल सामान्य ठेवू शकता. चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास हे प्रभावी आहे. सर्दी आणि थंडीच्या दिवसात कुलथी जास्त प्रमाणात खाल्ले जाते. तसेच थंडीमध्ये आराम मिळतो. त्याचा वापर मासिक पाळी नियमित करण्यास उपयुक्त आहे. लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे तिचे सेवन हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते, जे पीरियड्स दरम्यान कमी होते. हे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com