सावधान! तुमच्या सॅनिटायझरमध्येही मिथाइल अल्कोहोल नाही ना? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

how to care when buy sanitizer

भेसळयुक्त सॅनिटायझरच्या वापरामुळे त्वचेची समस्या उद्भवण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही दुकानातून सॅनिटायझर खरेदी करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नियमावलीमध्ये हे सॅनिटायझर बसतात की नाही, हे देखील तपासून पाहणे गरजेचे आहे.

सावधान! तुमच्या सॅनिटायझरमध्येही मिथाइल अल्कोहोल नाही ना?

नागपूर – कोरोना काळात सॅनिटायझर आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग झाला आहे. आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे सॅनिटाझरयचा वापर अनिवार्य आहे. पण, तुम्ही वापरत असलेले सॅनिटायझर खरंच सुरक्षित आहे का? त्यामध्ये भेसळ तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारण आता सॅनिटायझरच्या नावाखाली बाजारामध्ये अनेक प्रॉडक्ट विक्रीसाठी आले आहेत.

अलिकडेच कंझ्युमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाने सांगितले की, काहीजण निव्वळ नफा मिळविण्यासाठी बाजारात घुसले असून त्यांच्या सॅनिटायझरच्या उत्पादनामध्ये भेसळ आहे. 

99.9 टक्के विषाणूला मारणारा, सुगंधी वास असलेला, अल्कोहोल बेस असलेला अशा नावाने अनेक सॅनिटायझर्स बाजारात उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते.  पण, यामध्ये मिथाइल अल्कोहोलचे प्रमाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना महामारीच्या काळात आपण काम करताना, प्रवासात हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतो. पण, यामधे मिथाईल अल्कोहोलचे प्रमाण असेल तर ते वापरणे धोकादायक ठरू शकते. तशी माहितीही कंझ्युमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आली आहे. यामध्ये तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त सॅनिटायझर्स भेसळयुक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे मिथाइल अल्कोहोल?
मिथाइल अल्कोहोल एक विषारी पदार्थ आहे. त्वचा, डोळे, फुफ्फुसांमध्ये त्रास होऊ शकतो. मिथाइल अल्कोहोलच्या संपर्कात येणाऱ्यांना यापासून इजा होण्याची शक्यता असते. मिथाइल अल्कोहोल प्लॅस्टिक, पॉलिस्टर, सॉलव्हन्ट बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये वापरण्यात येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

मिथाइल अल्कोहोल त्वचेच्या आत शोषून घेतलं जातं. यामुळे इजा होण्याची शक्यता असते. डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्याचसोबत उलट्या होणं, डोकेदुखी आणि जास्त संपर्कात आल्यास प्रसंगी मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते, असे कंज्युमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे मानद सचिव डॉ. एम. एस. कामथ सांगतात.

सॅनिटायझर खरेदी करताना 'अशी' घ्या काळजी -
या भेसळयुक्त सॅनिटायझरच्या वापरामुळे त्वचेची समस्या उद्भवण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही दुकानातून सॅनिटायझर खरेदी करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नियमावलीमध्ये हे सॅनिटायझर बसतात की नाही, हे देखील तपासून पाहणे गरजेचे आहे. सॅनिटायझरमध्ये इथाइल अल्कोहोलचं प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर उत्तम. याशिवाय अनेकदा अल्कोहोलमुळे हात कोरडे पडू शकतात. त्यामुळे ग्लिसरीनयुक्त सॅनिटायझर असेल तर त्याचा फायदा होतो. तसेच बाजारात सुगंधी सॅनिटायझर उपलब्ध आहेत. मात्र, ते खरेदी करणं टाळावे.

जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश –                                                                 सॅनिटायझरमध्ये कोणतीही सुगंध असू नये. मुदत स्पष्टपणे नमूद केलेली असावी, निर्माता परवाना क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख करणं आवश्यक आहे. तसेच पीएच पातळी 6-8 टक्के आणि सूक्ष्मजंतूंची कार्यक्षमता 99.9 टक्के असणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे सॅनिटाझरबाबत निर्देश आहेत.
 

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top