esakal | कोरोना संक्रमणाची भीती वाटतेय? अशा करा भाज्या स्वच्छ!
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

भाज्या स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे असते. कोरोनाकाळात त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.
जाणून घेऊ या की वेगवेगळ्या भाज्या आणि फळे कशा स्वच्छ करायच्या

कोरोना संक्रमणाची भीती वाटतेय? अशा करा भाज्या स्वच्छ!

sakal_logo
By
टीम ईसकाळ

नागपूर : भाजीपाला आपल्या स्वयंपाकघरात येईपर्यंत बराच प्रवास करीत येतो, अशा परिस्थितीत भाज्या स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे असते. कोरोनाकाळात त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.
जाणून घेऊ या की वेगवेगळ्या भाज्या आणि फळे कशा स्वच्छ करायच्या

*बटाटे आणि गाजर सारख्या भाज्या जमिनीखाली उगवत असल्याने त्या स्वच्छ करण्यासाठी ब्रश किंवा स्पॉन्जचा वापर करू शकता. त्याच प्रकारे सफरचंद, काकडी, कलिंगड, डाळिंब आणि केळी देखील स्वच्छ करू शकता.

*टोमॅटो आणि बियांवाली फळे पाण्याच्या हळू धारेखाली धुवावी आणि हळुवार हाताने चोळून घ्यावे. नंतर स्वच्छ कापडावर पसरवून वाळवून घ्याव्या.
पानकोबी स्वच्छ करताना बाहेरची पाने काढून घ्यावी. त्यानंतर भाज्यांच्या ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करावे.

* फुलकोबी आणि भेंडी स्वच्छ करताना कोमट पाण्यामध्ये थोडावेळ बुडवून ठेवावे, नंतर थंड पाण्याने धुऊन घ्यावे.

*पालक किंवा हिरव्या पालेभाज्या एका भांड्यात कोमट पाण्यात काही मिनिटे ठेवा. नंतर गाळणीने त्यामधील पाणी काढून घ्या.असे किमान एक-दोन वेळा पुन्हा पुन्हा करावे.
*कोमट पाण्यात बेकिंग पावडर आणि व्हिनेगर सम प्रमाणात घालून त्यात भाज्या टाकाव्या. काही काळ राहू द्याव्या नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन फ्रीज मध्ये ठेवू शकता.

कांद्याने केला वांधा, आणले सामान्यांच्या डोळ्यात पाणी

*कोमट पाण्यात मीठ, हळद, व्हिनेगर हे तिन्ही समप्रमाणात टाकावे. आता यामध्ये फळ आणि भाज्या ३० मिनिटे बुडवून ठेवा, नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
*कोमट पाण्यात मीठ टाका. आता या घोळात भाज्या टाका आणि हाताने चोळून स्वच्छ करा.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image