हिट एक्झॉशन, हिट स्ट्रोकपासून स्वतःला कसे वाचवाल? जाणून घ्या उष्माघाताची कारणे, लक्षणे आणि उपचार

How to protect yourself from heat exhaustion heat stroke Learn the causes symptoms and treatment of heatstroke Nagpur news
How to protect yourself from heat exhaustion heat stroke Learn the causes symptoms and treatment of heatstroke Nagpur news

नागपूर : एप्रिल अखेर आणि मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यंदा मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली. तापमानाने चाळीशी पार केली असून राज्यात उष्णतेची लाट भडकली आहे. उष्माघात म्हणजे उष्णतेचा आघात. इंग्रजीत त्याला सनस्ट्रोक म्हणतात. या व्याधीत सुरुवातीला चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही सामान्य लक्षणे रुग्णामध्ये पहायला मिळतात. याकडे दुर्लक्ष केल्यास जीवही गमवावा लागतो.

जास्त वेळ उन्हात काम केल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते. त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात (हिट एक्झॉशन) आणि उष्माघात (हिट स्ट्रोक) होय. सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्माघात होतो. त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात होय. शरीराने मर्यादेपेक्षा जास्त निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो. उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते.

जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात. उष्माघात हा प्रामुख्याने अर्भकं, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो. तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो. खेळाडूंना आणि बराच वेळ आउटडोअर काम करणाऱ्यांना उष्माघात होऊ शकतो.

ऊन आणि गरम हवेच्या झोतामध्ये काम करावे लागले किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात गेल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसमधील यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. उष्माघात होण्याचे नेमके कारण म्हणजे शरीरातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेहून शोषलेली उष्णता अधिक असते. यामुळे शरीराचे तापमान वाढते. उष्माघात झाल्यानंतर तातडीची वैद्यकीय सेवा मिळाली नाही तर मृत्यू ओढवतो.

उष्माघात आणि ताप येणे या भिन्न प्रक्रिया आहेत. ताप येण्यामध्ये शरीराचे तापमान नेहमीहून अधिक राहते. व्याख्येप्रमाणे उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान ३८.१ पेक्षा अधिक किंवा त्याहून अधिक तापमानाला स्थिर राहणे. सामान्यपणे दुपारी शरीराचे तापमान ३७.७० सेल्सिअस असते. उष्माघातामध्ये हे तापमान ४० सेल्सिअस होऊन ते जीवघेणे ठरते. चला तर जाणून घेऊया उष्णता विसर्जन आणि उष्माघात यात काय फरक आहे. तसेच उष्माघाताची कारणे, लक्षणे आणि उपचार...

उष्माघाताची कारणे पुढील प्रमाणे आहेत

अधिक प्रमाणात जंक फूड खाणे

आपल्याला घराबाहेर पडताच काहीतरी खायची इच्छा होते. उन्हात तर बाहेरच अधिकच खात असतो. यामध्ये जंक फूडचे प्रमाणात अधिक असते. यामुळे उष्माघात आणि उष्मा थकवा देखील होऊ शकतो. काही जंक फूडमध्ये मोनोसोडियम (मोनोसोडियम), ग्लूटामंट्ससह गरम आणि हानिकारक पदार्थ असतात. याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढवते. ज्यामुळे शरीर उष्माघाताचा सामना करू शकत नाही.

पाण्याची कमतरता

शरीरातील पाण्याचा अभाव हे उष्माघाताचे एक प्रमुख कारण समजले जाते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची अनेक प्रकरणे पाहिली जातात. भर उन्हात कमी पाणी पिऊन घराबाहेर पडले तर उष्माघात तर होईलच तसेच पाण्याच्या अभावामुळे होणाऱ्या अनेक रोगांचाही तुम्हाला सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत नारळ पाण्याचे सेवन नक्की करा.

उन्हात बाहेर पडणे

आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने भर उन्हात बाहेर पडावेच लागते. सूर्याची तीव्र किरण तोंड आणि शरीराच्या इतर भागांना स्पर्श  करते तेव्हा उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. कामानिमित्त बाहेर निघाल्याने आपल्याला हे सर्व सोसावे लागते. उष्णता टाळण्यासाठी डोके, तोंड आणि हात हलके कपड्याने झाकून ठेवावे. शक्य असल्यास छत्रीसह घराबाहेर पडलेले बरे.

थायरॉईड असंतुलित

तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर उन्हात उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. थायरॉईड असमतोल झाल्यावर रक्तदाब बदलल्यास थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत उन्हात जाणे टाळा.

उष्माघाताची लक्षणे

  • उच्च ताप
  • कमी रक्तदाब
  • चक्कर येणे
  • उलट्या होणे
  • स्नायूंमध्ये कडकपणा
  • सतत घाम येणे
  • अशक्तपणा
  • त्वचेवर पुरळ
  • बेहोश होणे
  • डोकेदुखी
  • श्वास घेण्यास समस्या
  • भीती आणि अस्वस्थता

उष्माघातापासून बचाव कसा करावा

  • उन्हात बाहेर निघणे टाळा
  • उन्हात बाहेर पडताना छत्री वापरा
  • उन्हाळ्यात चहा-कॉफी किंवा गरम पदार्थ टाळा
  • शरीरात तापमान सामान्य राखण्यासाठी पाण्याची कमतरता येऊ देऊ नका
  • दिवसातून दोन ते तीन लीटर पाणी प्या
  • दीर्घकालीन काम टाळा
  • उष्माघात झाल्यास डॉक्टरांना भेटा
  • साखर असलेले पेय पिणे टाळा
  • खुले व हलके कपडे घाला
  • बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन आणि सनग्लासेस वापरा
  • संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या
  • जेव्हा तीव्र सूर्यप्रकाश असेल तेव्हा व्यायाम किंवा सायकल चालविणे टाळा

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com