थांबवता येऊ शकते आत्महत्या ! केवळ हवा असतो पाठीवर आपलेपणाचा हात

suicide_prevention
suicide_prevention

नागपूर : अभिनेता सुशांत सिंहची हत्या की आत्महत्या, यावर अजूनही चर्वितचर्वण सुरू आहे. सीबीआयसारख्या मोठ्या संस्थाही अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. उलट सुशांतच्या मृत्युच्या निमित्ताने सुरू झालेल्या चौकशीच्या निमित्ताने बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन बाहेर आले.आत्महत्या किंवा ड्रग सेवन यामागे मानसिक आजार हे कारण आहे, या निष्कर्षापर्यंत वैद्यकीय क्षेत्र पोहोचले आहे. आणि आत्महत्या थांबविण्यासाठी नैराश्यग्रस्त व्यक्तीवर मनोवैज्ञानिकांच्या माध्यमातून उपचार करण्याचे प्रयत्न होत आहेत.

आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे, कारण आजची जीवनशैली. आज प्रत्येक व्यक्ती तणावात आहे. कामाचे वाढलेले तास, सतत स्वत: प्रुव्ह करण्याची धडपड, विद्यार्थी जीवनातील जीवघेणी स्पर्धा अशा अनेक गोष्टी वाढत्या आत्महत्यांच्या मुळाशी आहेत.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर आत्महत्येच्या कितीतरी घटना कानावर आल्या. लॉकडाऊनच्या काळात नैराश्यातून आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या. त्यात अगदी सामान्य लोकांपासून ते सेलेब्रेटीं असणाऱ्यांचाही समावेश होता. बॉलिवूड, टॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे आत्महत्येचे प्रमाण या काळात वाढले. पण एखादी व्यक्ती लगेचच इतकं टोकाचं पाऊल उचलते असं नाही, तर त्या आधी व्यक्तीमध्ये अनेक लक्षणं दिसतात. त्यावेळी त्या व्यक्तीला आप्तांच्या मदतीची खरी गरज असते.

 सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगाचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. लाॅकडाऊनच्या काळात घरी राहणे,  शारिरीक व्यायामाची कमतरता, इत्यादी अनेक कारणे यामागे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. दरवर्षी जवळपास ८ लाख लोकं आत्महत्या करतात. साधारण एका आत्महत्येमागे २० पेक्षा अधिक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो.

तेव्हाच एवढे टोकाचे पाऊल उचलले जाते
एखाद्या व्यक्तीच्या भावना खूप दुखावल्या असतील, जवळच्या व्यक्तीमुळे त्रास झाला असेल किंवा नातेसंबंध बिघडले असतील आणि सगळ्यात महत्त्वाचे ती व्यक्ती आयुष्याला कंटाळलेली असेल तर ती व्यक्ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलते. डिप्रेशन, मद्यपान, ड्रग्ज, गंभीर किंवा दीर्घकाळ आजारपण देखील आत्महत्येसाठी कारण ठरू शकतं.

ही आहेत लक्षणं
आत्महत्येचा विचार मनात आलेली व्यक्ती सतत नकारात्मक विचार करते. त्यांना त्यांच्या आयुष्यात काही चांगलं नाही, आपलं कुणीच नाही असं वाटायला लागतं. अशा व्यक्ती नेहमी आत्महत्येबाबत बोलत असतात. इंटरनेटवर किंवा इतर ठिकाणी आत्महत्येचा मार्ग शोधतात. जवळच्या व्यक्तीपासून दूर राहतात. आपली इच्छा लिहून ठेवतात.

अशी लक्षणे आढळललेल्या व्यक्तीला त्या काळात सांभाळले तर आत्महत्येच्या अनेक घटना रोखता येतील.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com