कोविड रुग्णांचा आहार कसा आसावा? घ्या 'ही' काळजी

कोविड रुग्णांच्या आरोग्याची घ्या काळजी
कोविड रुग्णांचा आहार कसा आसावा? घ्या 'ही' काळजी

कोरोना (covid-19) विषाणूचा वाढलेला प्रकोप अद्यापही कमी झालेला नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोविड सेंटर आणि रुग्णालये येथेदेखील बेड व ऑक्सिजन सिलेंडर यांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळेच ज्या रुग्णांमध्ये (patients) कोविडची सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांना घरीच आयसोलेट होण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, लक्षणे जरी सौम्य असली तरीदेखील अशा रुग्णांच्या आहाराकडे व त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच कोविड रुग्णांना कोणत्या प्रकारचा आहार द्यावा किंवा कोणते पदार्थांपासून त्यांना दूर ठेवावं हे पाहुयात. (how-to-prepare-healthy-meal-boxes-for-covid-19-patients)

१. तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा -

कोविड रुग्णांना चुकूनही तळलेले तेलकट, मसालेदार पदार्थ देऊ नयेत. त्यामुळे त्यांना आरोग्यविषयी समस्या निर्माण होऊ शकतात. मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ होणे, अॅसिडिटी किंवा गॅसेसचा त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोविड रुग्णांच्या जेवणामध्ये सात्विक व सौम्य पदार्थांचा समावेश करावा, असं अहमदाबादमधील डॉक्टर रविंद्र मेहता यांनी सांगितलं.

२. जंकफूड, प्रोसेस्ड फूड बंद -

न्युट्रिशनिस्ट आरुषी अग्रवाल यांनी कोविड रुग्णांना जंकफूड व प्रोसेस्ड फूडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याऐवजी इडली, डोसा, दही, ताक या पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा.

३. ताजे अन्नपदार्थ द्या -

कोविड रुग्णांना ताजं आणि शिजवलेलंच अन्न द्यावं. वेलनेस एक्स्पर्ट डॉ. वरुण कात्याल यांच्या मतानुसार, कोविड रुग्णांना ताजं अन्नच दिलं पाहिजे. तसंच हे पदार्थ शिजवण्यापूर्वीदेखील काही नियमांचं पालन केलं पाहिजे. शक्यतो कोविड रुग्णांना द्रवपदार्थ जास्त द्यावेत. यात सूप,स्मुदी, ज्यूस यांचा समावेश असावा.

४. आहारात करा या पदार्थांचा समावेश -

आहार विशेषज्ञ हिमांशू राय यांनी कोविड रुग्णांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे सांगितलं आहे. त्यांच्या नुसार, प्रोटीन, आर्यन, व्हिटामिन ए, सी, झिंक आणि सेलेनिअम यांचा प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे.

हळद,मोहरी, पुदिना, कोथिंबीर, आंबा, खरबूज, पपई, टरबूज यांचा नियमित आहारात समावेश केला पाहिजे.

५. कोविड रुग्णांनी या गोष्टी करु नयेत -

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मेसेज किंवा माहितीवर विश्वास ठेऊ नये.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही डाएट फॉलो करु नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com