esakal | Coronavirus : मुलांची घ्या काळजी; आयुष मंत्रालयाची नवीन गाईडलाईन
sakal

बोलून बातमी शोधा

mis-c children

मुलांची घ्या काळजी; आयुष मंत्रालयाची नवीन गाईडलाईन

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा (Covid-19) संसर्ग झपाट्याने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना व तरुणांना अधिक धोका असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, ही लाट येण्यापूर्वी लहान मुलांमध्ये संसर्ग होत आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी यासाठी आयुष मंत्रालयाने मार्गदर्शन केलं आहे. ट्विट करुन त्यांनी लहान मुलांसाठीची नवीन गाईडलाईन (ayush-ministry) दिली आहे. या गाईडलाईनमध्ये आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांसोबत मास्क वापरणे, योग करणे, डॉक्टरांच्या संपर्कात राहणे असे काही सल्ले देण्यात आले आहेत. (how-to-take-care-of-children-to-save-them-from-covid-19-ayush-ministry-comes-out-with-homecare-guidelines)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं म्हटलं होतं. मात्र, या विषाणूच दुसरी लाट ओसरत असतांनाचा लहान मुलांना याचा फटका बसला आहे. आतापर्यंत अनेक लहान मुलांना या विषाणूची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच लहान मुलांना कोरोना होऊ नये यासाठी पहिलेच प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. असं या गाईडलाईनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा: घरीच वाढवा रोगप्रतिकारक शक्ती;आयुष मंत्रालयाने दिल्या टीप्स

कोरोना विरुद्धच्या लढाईत आयुर्वेदिक उपचार प्रतिबंधात्मक औषध म्हणून फायदेशीर ठरत आहेत. यामध्येच लठ्ठपणा, शुगर टाइप १ क्रोनिक कॉर्डियोपल्मोनरी किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढीस आणण्याची गरज आहे. तसंच येत्या काळात कोरोनाचे येत असेलेल नवनवीन स्ट्रेन पाहून मुलांसाठी दिलेली गाईडलाईन आणि प्रोटोकॉल फॉलो करणंही अत्यंत गरजेचं आहे.

प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांची काळजी घेणं जास्त आव्हानात्मक असतं. कारण, मुलांमध्ये मानसिक, रोगप्रतिकारक आणि फिजिओलॉजी यांच्यात विभिन्नता आढळून येते.

लहान मुलांसाठी फॉलो करा 'ही' गाईडलाईन

१. कोणत्याही वस्तूला हात लावल्यावर मुलांना हात धुण्यास सांगा.

२. घराबाहेर पडताना मास्क आवश्यक घाला

३. लहान मुलं हात धुण्यास, मास्क घालण्यास टाळाटाळ करत असतील तर त्यांना या मागचं कारण प्रेमाने समजवा.

४. ५ ते १८ वयोगटातील मुलांनी मास्क वापरण अत्यंत गरजेचं आहे.

५. २ ते ५ या वयोगटातील मुलांची इच्छा असेल तेव्हाच त्यांना ते घाला. तसंच त्यांनी मास्क घातल्यानंतर त्याच्याकडे पालकांनी लक्ष द्या.

६. नॉन मेडिकल किंवा तीन लेअर असलेल्या सुती कपड्याचा मास्क मुलांसाठी योग्य आहे.

७. गरज नसतांना मुलांना घराबाहेर पाठवू नका.

८. लहान मुलांना शक्यतो व्हिडीओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातूनच इतरांच्या संपर्कात ठेवा.

९. जर मुलांमध्ये कोविड संसर्गची लक्षण आढळल्यास त्यांनी घरातील वृद्धांपासून दूर ठेवा.

लहान मुलांमध्ये आढळून येतात 'ही' लक्षण

सतत ४-५ दिवस ताप येणे, जेवण न जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी होणे, मुलं सतत सुस्तावलेली असणे अशा प्रकारची कोणतीही लक्षणं लहान मुलांमध्ये आढळल्यास त्यांना त्वरीत डॉक्टरांकडे न्या.

गाईडलाईनप्रमाणे अशी घ्या मुलांची काळजी

१.दररोज लहान मुलांना कोमट पाणी प्यायला द्या.

२. दोन वर्षांवरील मुलांनी सकाळी व रात्री असं दोन वेळा ब्रश केलं पाहिजे.

३. पाच वर्षांवरील मुलांची तेलाने मालिश करावी.

४. मुलांकडून कोमट पाण्याच्या गुळण्या करुन घ्याव्यात.

५. लहान मुलांच्या नाकात २ थेंब तेल टाकणं, प्राणायम करणे, ध्यान करणं असा शारीरिक अभ्यास मुलांकडून करुन घ्या.

दरम्यान, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना दररोज हळदीचं दूध, च्यवनप्राश, आयुर्वेदिक काढे दिले पाहिजेत. तसंच मुलांची पुरेशी झोप पूर्ण होणं गरजेचं आहे, संतुलित आहार देणंदेखील तितकंच गरजेचं आहे.

loading image
go to top