
कोविड-१९ च्या काळात नवजात बाळांना स्तनपान करावं की करु नये असा मोठा प्रश्न स्त्रियांच्या मनात होता. आपल्या दुधावाटे शरीरातील कोरोना विषाणू बाळाच्या शरीरात जातील की काय हा एकच प्रश्न त्यांना सतत पडायचा. मात्र, आईच्या दुधावाटे सार्स-सीओव्ही-२ चा प्रसार होत असल्याचा कोणताही सबळ पुरावा अद्याप मिळालेला नाही. जन्मानंतर पहिल्या काही महिन्यात बाळाची रोगप्रतिकारशक्ती विकसनशील अवस्थेत असते, अशावेळी आईच्या दुधातून मिळणाऱ्या अँटीबॉडीज बाळाचं संरक्षण करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार, कोविड-१९ झाल्याची जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत बाळाला स्तनपान करता येऊ शकतं. यामुळे बाळांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढते व कोविडचा संसर्गदेखील त्यांना होत नाही. (Is it safe to breastfeed if the mother is corona positive)
पण तरी शरीरातून श्वासावाटे, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या थेंबांमधून आईकडून मुलाला संसर्ग होण्याचा धोका असतो त्यामुळे आईने स्तनपान करवताना सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करायला हवे. क्लिनिकल स्थितीमुळे जर आईला बाळापासून दूर राहणे भाग असेल तर आईने स्तनांमधून दूध काढून देणे किंवा दुसऱ्या महिलेने स्तनपान करवणे हे पर्याय सुचवले गेले पाहिजेत.
स्तनपान करताना घ्या 'ही' काळजी
१. स्तनपान करवण्यापूर्वी किंवा ब्रेस्ट पंप्स वापरण्यापूर्वी साबण आणि पाण्याच्या सहाय्याने हात स्वच्छ करावेत.
२. साबण व पाणी उपलब्ध नसेल तर अल्कहोलचे प्रमाण कमीत कमी ६०% असलेले हॅन्ड सॅनिटायझर वापरा.
३. बाळ स्तनपान करत असताना किंवा ब्रेस्ट पंप्स वापरत असताना आईने तोंड व नाक नीट झाकून घेणे. किंवा, फेस मास्कचा वापर करणे.
४. ब्रेस्ट पंप्स वापरण्यापूर्वी उत्पादकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ते नीट स्वच्छ व सॅनिटाइज करा.
प्रसूतीनंतर मातेच्या स्तनातून येणारा पहिला स्त्राव
प्रसूतीनंतर मातेच्या स्तनातून येणारा पहिला स्त्राव हा विज्ञानाला ज्ञात असलेला सर्वाधिक सक्षम नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती देणारा बूस्टर आहे. हा स्त्राव म्हणजे जणू बाळाला मिळणारी पहिली लस, यामध्ये भरपूर पोषक घटक तर असतात शिवाय विविध संरक्षक घटक देखील प्रचंड प्रमाणात असतात, ते संसर्गरोधी क्रिया करतात, बाळाच्या शरीराला रोगप्रतिकारक्षमता पुरवतात तसेच बाळाच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या प्रक्रियेला चालना देतात.
बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला आईचे पहिले स्तनपान करवले गेले पाहिजे आणि पुढील पहिले सहा महिने फक्त स्तनपान करवले गेले पाहिजे, जे पुढे कमीत कमी दोन वर्षे सुरु ठेवले पाहिजे या सूचनेला जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी पाठिंबा दिला आहे.
(डॉ. नेहा पवार या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसूती तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.