
सद्गुरू
आनंद कशाबद्दल आहे? आनंद नक्कीच एका ठरावीक गोष्टीबद्दल नाही, कारण आनंद म्हणजे अशी गोष्ट नाही जी तुम्ही तयार करता, आनंद हे असे काही आहे जे तुम्ही बनता; ती जगण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर तुमच्या शरीराने एक ठरावीक सुखदपणा प्राप्त केला, तर आपण त्याला सुख म्हणतो. जर तुमच्या मनाने एक ठरावीक सुखदपणा प्राप्त केला, तर आपण त्याला शांती किंवा आनंद म्हणतो. जर तुमच्या जीवनऊर्जेने ठरावीक सुखदपणा प्राप्त केला, तर आपण त्याला आनंद म्हणतो. तुम्ही तुमच्या आतील जीवनाच्या मूलभूत प्रक्रियेला विचलित केले नाही, तर आनंद हा स्वाभाविक परिणाम आहे. आनंद ही काही साध्य करण्याची गोष्ट नाही; आनंद हा तुमचा मूळ स्वभाव आहे.