योग- जीवन : प्रणव

प्रणव हे ईश्वराचे नाव आहे. प्रणव व ईश्वराचा संबंध नित्य आहे. ज्याला आदी-अंत नाही असा तो शाश्‍वत संबंध आहे. तो मानवनिर्मित किंवा भाषानिर्मित नाही.
bhardwajasan
bhardwajasansakal
Updated on
Summary

प्रणव हे ईश्वराचे नाव आहे. प्रणव व ईश्वराचा संबंध नित्य आहे. ज्याला आदी-अंत नाही असा तो शाश्‍वत संबंध आहे. तो मानवनिर्मित किंवा भाषानिर्मित नाही.

- किशोर विष्णू आंबेकर

तस्य वाचक : प्रणव ll समाधिपाद सूत्र- २७ ll

प्रणव हे ईश्वराचे नाव आहे. प्रणव व ईश्वराचा संबंध नित्य आहे. ज्याला आदी-अंत नाही असा तो शाश्‍वत संबंध आहे. तो मानवनिर्मित किंवा भाषानिर्मित नाही.

ज्याच्या योगे सर्वोत्तम स्तुती केली जाते, तो प्रणव. ॐकारालाच प्रणव असे म्हणतात. वेदच वस्तूतः परमात्म्याची सर्वोत्तम स्तुती होय. वेद अलौकिक, अपौरुषेय आहेत. वेद अपरिमित, अनंत आहेत. ते कंठस्थ ठेवणे महाकठीण आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण अर्थ ज्यात आहे आणि जे कंठस्थ करायला, लक्षात ठेवायला अत्यंत सोपे आहे, असे जे पद असेल तेच सर्वोत्तम म्हटले पाहिजे. ॐ हे तसे पद आहे. ते एकाक्षर आहे. तो एकाक्षरी वेद आहे.

विश्वाची निर्मिती ओम या आदीम ध्वनीमधून झाली. ध्वनी म्हणजे स्पंदन. स्पंदन हे परमेश्वराच्या निर्मितीचे अत्यंत सूक्ष्म रूप असल्याने त्याच्या अत्यंत जवळचे असते. म्हणून स्पंदनाच्या आधाराने आपण परमेश्वराच्या अत्यंत जवळ जाऊ शकतो.

‘ॐ’ हा विश्वनिर्मात्याने उच्चारलेला प्रथम, आदिम असा उच्चार आहे. तो प्रत्येक निर्मितीचे उगमस्थान आहे.आवाजशून्य परमात्म्याचा तो आवाज आहे (मैत्रायणी उपनिषद).

आपण बोलण्यासाठी तोंड उघडले, की पहिला उच्चार ‘अ’ चा असतो. उच्चार लांबवला की तो ‘उ’कडे झुकणारा असतो. उच्चार संपताना ओठ मिटतात तो ‘म’चा उच्चार असतो. अ, उ आणि म ह्या तीन अक्षरांनी ॐ बनलेला आहे. सर्व शब्द व भाषांचे मूळ ॐ आहे. शब्दब्रह्म व नादब्रह्माचे मूळ ॐ आहे. सर्व नामे बीज रुपाने ओमकारात, प्रणवात असतात. सर्व नामसाधना ह्या ॐकार, प्रणव साधनाच असतात.

एकाग्रतेशिवाय काहीच हाती लागत नाही. परमेश्वरावर एकाग्रता केल्याशिवाय तो आपल्या अंतरंगात वसतो याचा बोध होत नाही. त्यासाठी एक तत्त्वाभ्यास सांगितला आहे. म्हणून साधक ॐकारावर लक्ष केंद्रित करतो.

प्रणवजप ही सगुण भक्ती आहे. सतत, निरंतर, भावपूर्ण अंतःकरणाने, अर्थ समजून घेऊन आणि त्याचे महत्त्व पूर्णत्वाने समजून-उमजून ही साधना करावी लागते.

अय्यंगार गुरुजी म्हणतात, ‘‘योगासन हेच ईश्वराचे प्रतीक आहे. त्याचा सतत जप म्हणजे - ‘अ’. आसनाचा उपयोग, महत्त्व, अर्थ, हेतू यांचे स्मरण म्हणजे- ‘उ’. त्यातून निर्माण होणारी शांती, स्थैर्य व आनंद म्हणजे- ‘म’. आसन हीच माझी प्रार्थना, पूजा आणि भक्ती. आसनामध्येच मी आत्मानंद प्राप्तीचा अर्थ शोधला. त्याचप्रमाणे पूरक, कुंभक आणि रेचक यांचा आस्वाद घेतच आत्मचैतन्य, चैतन्यशक्ती, जाणीव शरीरभर पसरवली.’’

आजचे आसन - भरद्वाजासन-२

  • दंडासनात बसा.

  • डावा पाय वीरासनात वाकवा.

  • उजवा पाय गुडघ्यात वाकवून, डाव्या मांडीच्या मुळाशी ओटी पोटाजवळ ठेवा म्हणजे उजव्या पायाची टाच बेंबीजवळ येईल. अशा तऱ्हेने उजवा पाय पद्मासनात राहील.

  • श्‍वास सोडा. उजवा हात खांद्यापासून पाठीमागे न्या. उजवे कोपर वाकवा आणि उजव्या हाताने उजवे पाऊल घट्ट पकडा.

  • डावा हात ताठ करा. डावा हात उजव्या गुडघ्याखाली घ्या, जेणेकरून तळहात जमिनीवर व बोटे डावीकडे रोखलेली असतील.

  • धड आणि मान शक्यतितकी उजवीकडे अधिक प्रमाणात वळवा.

  • साधारण किंवा दीर्घ श्वसन करीत एक मिनीट थांबा.

  • हेच आसन दुसऱ्या बाजूसही करा.

फायदे

  • गुडघे व खांदे लवचिक बनतात.

  • संधिवाताचा विकार असणाऱ्यांना लाभदायक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com