योग- जीवन : ताण व्यवस्थापन

लक्ष केंद्रित करण्यासाठी, क्षमता सिद्ध करण्यासाठी, कोणतेही काम करण्यासाठी आपल्यात पुरेसे गांभीर्य निर्माण करणारी यंत्रणा म्हणजे मानसिक ताण होय. असा इष्ट ताण आवश्यक असतो.
ustrasana
ustrasanasakal
Summary

लक्ष केंद्रित करण्यासाठी, क्षमता सिद्ध करण्यासाठी, कोणतेही काम करण्यासाठी आपल्यात पुरेसे गांभीर्य निर्माण करणारी यंत्रणा म्हणजे मानसिक ताण होय. असा इष्ट ताण आवश्यक असतो.

- किशोर विष्णू आंबेकर, अय्यंगार योग शिक्षक

लक्ष केंद्रित करण्यासाठी, क्षमता सिद्ध करण्यासाठी, कोणतेही काम करण्यासाठी आपल्यात पुरेसे गांभीर्य निर्माण करणारी यंत्रणा म्हणजे मानसिक ताण होय. असा इष्ट ताण आवश्यक असतो. तोच प्रमाणाबाहेर वाढल्यास त्रासदायक होतो व त्याचे निर्मूलन करावे लागते. त्याला ताण व्यवस्थापन असे म्हणतात.

कारणे

सांसारिक सुख व आत्मिक समाधान यांचे संतुलन कसे साधायचे याची माहिती नसणे हे ताणाचे मुख्य कारण आहे. विज्ञानाच्या प्रगतीने जीवनात सुखे निर्माण केली असली तरी एकंदर जीवनाचा वेग खूप वाढला आहे. मेंदू आणि मनाला विश्रांती मिळत नाही. ताण हा अतिक्रियाशीलतेमुळे, निष्क्रियतेमुळे किंवा कंटाळ्यातून उद्‍भवतो. काम करण्याची आवड, इच्छा नसल्याने कामाचा भार फार आहे असे वाटते. नकारात्मक दृष्टिकोनामुळे लगेच दमायला होते. कष्ट न करता प्रचंड अपेक्षा बाळगल्यास ताण येणारच. रोगट स्पर्धेची, इर्षेची मानसिकता, योग्य संवादाचा अभाव यामुळेही ताण-तणाव वाढतो.

परिणाम

ताणतणावांमुळे आपल्या आरोग्यावर, कार्यक्षमतेवर आणि नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होतात. शारीरिक, मानसिक थकवा येतो. मज्जासंस्था, ग्रंथी संस्था आणि रोगप्रतिकार प्रणाली यामध्ये असंतुलन निर्माण होते. भूक, झोप आणि कामवासना यांच्यामधील संतुलन बिघडते. जास्त घाम येणे, चिडचिड होणे, निष्कारण काळजी, भीती वाटणे. विचारांमध्ये स्पष्टता नसणे अशीही लक्षणे दिसतात. वेळीच उपाययोजना न केल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे अनेक विकार उद्‍भवू शकतात.

व्यवस्थापन

योग्य औषधोपचार, समुपदेशन आणि जीवनशैलीतील आवश्यक फेरबदल यांचा अवलंब वेळच्या वेळी करणे गरजेचे असते. कला, संगीत, क्रीडा, व्यायाम, उत्तम वाचन यासाठी सवड काढणे उपयोगी पडते. योग मनाला शांत करणारे आणि सर्वांगीण प्रतिकारशक्ती वाढवणारे नैसर्गिक औषध आहे. सकारात्मक व नकारात्मक दोन्ही परिस्थितीत ते काम करते. योगशास्त्राची विचारसरणी मनाच्या हालचालींना नियमित, नियंत्रित करणारी आहे. योगाभ्यासात स्नायूंच्या शिथिली करणा बरोबरच स्नायूबंध, अस्थिबंध, पेशी, अंतर्गत अवयव, ज्ञानेंद्रिये, मज्जा, मेंदू, मन आणि जाणिवेला शिथिल आणि शांत केले जाते. मेंदूची ताण सहन करण्याची क्षमता वाढवता येते. आत्मबल वाढल्यास ताण-तणावांचा प्रश्नच उद्‍भवत नाही.

ताणतणावात असताना आपण शवासन करू शकत नाही. त्यासाठी इतर अनेक आसनांमध्ये आपल्याला अनेक प्रकारे शरीरावर काम करावे लागते. शीर्षासन, सर्वांगासन, विपरीत करणी अशा आसनांमध्ये मज्जा संस्था ताण विरहित होते. त्यानंतर शवासन हे फलदायी होत असते.

उष्ट्रासन

  • गुडघे एकत्र ठेवून गुडघ्यांवर उभे राहा. मांड्या, पोटऱ्या व घोटे जुळवून ठेवा. पावलांचा वरचा भाग जमिनीवर टेकवा व पायांची बोटे मागे ताणा.

  • तळवे नितंबांवर ठेवा. मांड्या किंचित पुढे ढकला व धड मागे वाकवा. पाठीचा कणा शक्य तितका आत घेत जास्तीत जास्त मागे वाका.

  • डोके मागे न्या. छाती विस्तृत करा व दोन्ही हात खांद्यापासून पावलांच्या दिशेने ताणा. हातांनी दोन्ही टाचा पकडा किंवा शक्य असल्यास तळवे तळपायांवर सपाट ठेवा.१० ते १५ सेकंद थांबा.

उपयोग

  • उतरते खांदे आणि पाठीला कुबड असणाऱ्यांना लाभदायक.

  • पाठीचा कणा सुदृढ बनतो.

  • संपूर्ण मज्जारज्जूला योग्य ताण बसतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com