
खजूर हिवाळ्यात खाणे शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतं.
तुम्ही अनेक मधुमेहाने त्रस्त रुग्णांना आपल्या खानपानावर लक्ष देताना पाहिलं असेल. त्यांना आपल्या अन्नावर नियंत्रण ठेवावं लागतं. डायबेटीज असलेले लोक भात, गोड पदार्थ, ज्यूस सारख्या अनेक पदार्थांच्या सेवन करु शकत नाही. अशा अनेक पदार्थांबद्दल त्यांना पथ्य पाळावं लागतं. डायबेटीजच्या दरम्यान हाय शुगर अथवा हाय कॅलरीवाले खाद्य पदार्थ खायचे नसतात. अनेक लोकांना खजूर आवडतात.
मात्र, डायबेटीजच्या लोकांना खजूर खाण्यापासून देखील वंचित रहावं लागतं. खजूर हिवाळ्यात खाणे शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. खजुरामुळे प्रतिकारशक्ती तर वाढतेच तसेच शरिराला अनेक फायदे होतात. खजुरामध्ये आयरन, एँटीऑक्सिंडंट्स सोबतच कॅलरीज देखील भरपूर प्रमाणात असतात. यासाठी डायबेटीजचे लोक हे खाताना घाबरतात. जर आपण देखील याच प्रश्नाने चिंतेत असाल तर जाणून घ्या की याबाबत एक्सपर्ट्स काय म्हणतात.
डायबेटीजच्या लोकांना खाण्यापिण्यावर का ठेवावा लागतो कंट्रोल?
खाण्यापिण्यावर कंट्रोल फक्त डायबेटीजने पीडित लोकांनाच नव्हे तर सर्वांनीच केला पाहिजे. मात्र, जे लोक डायबेटीजच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी खासकरुन हाय शुगर आणि हाय कॅलरीच्या पदार्थांपासून लांब राहिलं पाहिजे. कारण यामुळे आपलं ब्लड शुगर लेव्हल अनियंत्रित होऊ शकते. जे आपल्या आरोग्यासाठी खूपच हानीकारक आहे.
डायबेटीजचे लोक खजूर खाऊ शकतात का?
एक्सपर्ट्स असं सांगतात की, डायबेटीजने पीडित व्यक्तीला खजूर खायचा असेल तर त्या व्यक्तीला आपल्या खाण्याबरोबरच एक्सरसाइजवर देखील लक्ष द्यायला हवं. जर डायबेटीजचे रुग्ण या साऱ्या गोष्टी पाळत असतील तर ते दिवसातून दोन ते तीन खजूर खाऊ शकतात. ज्या लोकांना डायबेटीज असतो त्यांना गोड पदार्थातून दिवसातून फक्त 10 टक्के कॅलरी घेण्याचा सल्ला दिला जातो. जर हे लोक बाकी गोड पदार्थांसह तीन खजूरांचं सेवन करत असतील तर उघड आहे की त्यांच्या ब्लड शुगरची लेव्हल वाढेल. मात्र, जर त्यांनी आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष दिलं आणि कमीतकमी अर्ध्या तासासाठी व्यायाम केला तर ते खजूर खाऊ शकतात.