पूरग्रस्तांनी आरोग्याकडे करु नका दुर्लक्ष; घ्या 'ही' काळजी

पुराच्या पाण्यात बरेच दिवस राहिल्यामुळे अनेकांना शारीरिक तक्रारी जाणवू लागल्या आहेत.
State transport bus stucked in floods
State transport bus stucked in floods

काही दिवसांपूर्वी राज्यातील जवळपास ९ जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसला. या पुराचा जोर आता ओसरू लागला आहे. मात्र, या पुरात अनेक घरं उदध्वस्त झाली आहेत. इतकच नाही तर अनेक जण सध्या मानसिक व शारीरिकरित्या खचले आहेत. त्यातच पुराच्या पाण्यात बरेच दिवस राहिल्यामुळे अनेकांना शारीरिक तक्रारीदेखील जाणवू लागल्या आहेत. म्हणूनच, पूरग्रस्त भागातील व्यक्तींनी सध्याच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात. (maharashtra-flood-hit-area-flood-victims-take-care-your-health-ssj93)

पूरग्रस्त भागातील व्यक्तींनी घ्या 'ही' काळजी

१. पायांना किंवा हाताला भेगा पडल्या असतील किंवा चिखल्या झाल्या असतील तर कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने हात धुवावेत.

२. शक्य असल्यास कडुनिंबाच्या साली किंवा पानांच्या रसाने, तुळशीच्या रसाने हात स्वच्छ करावेत.

३. पायांच्या भेगांमध्ये खोबरेल तेल लावावे. यावेळी तेलात हळद घालावी. किंवाकैलास जीवन लावावे.

४. अंगाला तेल लावावे व पाण्यात कडुलिंब टाकून अंघोळ करावी.

५. ताप येऊ नये म्हणून पारिजातकाच्या पानाचा रस दिवसातून २/३ वेळा प्यावा. यासोबत गुळवेलीचा रस,तुळशीचा रस, आल्याचा रस घेतला तरी चालतो.

६. आहारामध्ये वरण भात, लसणाची फोडणी घातलेली खिचडी, भिजवलेल्या भाज्या असा हलका आहार घ्यावा.

७. जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून गुळवेल,पारिजातक, तुलसी, सुंठ, मिरे, दालचिनी, हळद आदींचा काढा घ्यावा. तुलसी स्पाइस इम्यून गोळ्या घ्याव्यात.

८. सध्याच्या काळात शांत झोप लागणं अशक्य आहे. मात्र,तरीदेखील निदान ५ -६ तास तरी शांत झोपण्याचा प्रयत्न करावा.

९. रात्री झोपताना पायाच्या तळव्यांना व हाताला खोबरेल तेल लावावे.

(लेखक डॉ. घनश्याम मर्दा पुण्यातील सूरज आयुर्वेद क्लिनिक व संशोधन येते आयुर्वेदाचार्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com