esakal | Weight Loss Tips : कॅलरीज बर्न करायच्या आहेत? मलायका अरोराची सोपी Trick फॉलो करा
sakal

बोलून बातमी शोधा

कॅलरीज बर्न करायच्या आहेत? मलायका अरोराची सोपी Trick फॉलो करा

कॅलरीज बर्न करायच्या आहेत? मलायका अरोराची सोपी Trick फॉलो करा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आपण सुदृढ असावं, असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी व्यायाम, योगासन, भरपूर चालण्यावर अनेकजण भर देतात. काहींना हे तंत्र जमतं. तर काहींना जमत नाही. पण ज्यांना जमतं ते फिट राहणाऱ्या सेलिब्रिटींना फॉलो करून त्यांच्यासारखा व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. वयाच्या ४७ व्या वर्षी आपल्या फिटनेसने सगळ्यांना मोहवणाऱया मलायका अरोराचा जिमबाहेरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोत मलायकाच्या ऑरेंज रंगाच्या स्पोर्ट्स ब्रा, पेंटबरोबरच तीने अँकल लेन्थमध्ये घातलेल्या फिटनेस बेल्टने लक्ष वेधले. जिमिंग नंतरही कॅलरीज बर्न करण्यासाठी 'अँकल वेट बेल्ट'चा सध्या उपयोग केला जात आहे. आजकाल अनेक सेलिब्रिटी याचा उपयोग करत आहेत.

ankle belt

ankle belt

अँकल लेन्थ बेल्ट काय आहे?

अँकल वेट हे व्यायामासाठी अत्यंत फायद्याचा असणारा बेल्ट नियमित जीमला जाणारे, एथलेटिक्स वापरतात. त्यामुळे कॅलरीज बर्न करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तज्ज्ञांच्या मदतीने प्रकारच्या जिम एक्सेसरिज वापरून तुम्ही अतिरिक्त चरबी आाणि कॅलरीज कमी करू शकता. मलायका सध्या हेच उपकरण जीमवरून आल्यावरही काही काळ वापरते आहे.

व्यायाम करताना या बेल्टचा चांगला उपयोग करता येऊ शकतो.

व्यायाम करताना या बेल्टचा चांगला उपयोग करता येऊ शकतो.

कधी वापराल?

चालताना, व्यायाम करताना, जॉगिंग करताना अशा काही कार्डिओ एरोबिक्स एक्टीव्हीटी करताना हा बेल्ट वापरता येऊ शकतो. याशिवाय क्रंच, स्क्वॅट्स आदी व्यायामाचे प्रकार योग्य प्रकारे कताना हा बेल्ट वापरल्याने अधिक चरबी, कॅलरी बर्न होते.

साधारण एवढे वजन वापरा

बहुतेक स्ट्रॅप ऑन उपकरणे ही ०५.-०१ किलो श्रेणीमध्ये उपलब्ध आहेत. अँकल लेंथचे वजन तुमच्या शरीराच्या वजनाच्या १-२टक्के असावे. असे असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने कॅलरिज चांगल्या बर्न होऊ शकतात.

तोटा काय?

जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल किंवा नव्याने व्यायाम करायला सुरूवात केली असेल , तर प्रशिक्षकांना विचारल्याशिवाय असा बेल्ट वापरू नका. कारण तुमच्या अँकलच्या वजनानुसार त्याचे वजन नियंत्रित केले जाते. प्रशिक्षकांना न विचारता वापरल्यास तुमचा फिटनेसवर अयोग्य परिणाम होऊ शकतो. तसेच या बेल्टचे वजन आपल्या वजनाच्या तीन टक्केपेक्षा जास्त होऊ देऊ नका. या बेल्टचा चुकीचा वापर केल्यास त्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो.

loading image
go to top