आरोग्यदायी लाल केळीचे अनेक फायदे, जाणून घ्या याबाबत

red banana
red banana

केळी हे आरोग्यासाठी अतिशय फायदीशर फळ असून कोणत्याही डाॅक्टर केळी खाण्याचा सल्ला देतात. परंतू प्रत्येकजण पिवळ्या केळी किंवा पायबल्ड केळीबद्दल माहित आहे. परंतु, लाल केळी म्हणजेच काय, त्याचे फायदे कोणते, आरोग्यासाठी किती लाभदायी याची माहिती नसेल. तर मग चला आज तुम्हाला आम्ही लाल केळीचे शरिसाठी किती फायदेशीर आहे. असे म्हटले जाते की लाल केळी सुक्रोज आणि फ्रुक्टोजने समृद्ध असतात, जे आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे चल तर मग या लाल केळीची आम्ही याची माहिती सांगतो... 

डोळ्यांसाठी उत्तम 
आजकाल, जीवनशैली, अन्न आणि संगणकावर अधिक काम केल्यामुळे डोळे लवकरच खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. यासाठी काही भाज्या आणि फळांचा अन्नात समावेश करावा, ज्यामुळे डोळ्यांना फायदा होऊ शकेल. लाल केळीमध्ये दोन प्रकारचे कॅरोटीनोईड्स आहेत ज्यामुळे आपल्याला डोळ्याच्या समस्यापासून लांब राहतो.

पचनक्रिया चांगली ठेवते
आजकालच्या धावपळीच्या जीवनात हॉटेलफूड, तळलेले अन्न इत्यादी बरेच पदार्थ आपणाकडून अति सेवन होत असते. त्यामुळे प्रत्येकाची पचनक्रिया बिघडलेली आहे. अशा आहारामध्ये आहारात असे काही फळांचा समावेश असावा ज्यामुळे आपले आरोग्य योग्य व पचन टिकेल. जर आपल्याला पचन योग्य ठेवायचे असेल तर आपण आहारात लाल केळीचा समावेश करा त्यामुळे तुमच्या शरिरातील बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळेल.

लोहाची कमतरता दूर करेल
सामान्य केळीमध्येही भरपूर लोह असते तसेच लाल केळीमध्ये सामान्य केळीपेक्षा काही अधिक लोह असल्याने शरीरात लोहाची कमतरता ही लाल केळी लगेच दूर करते. या केळीचे आपण नियमित सेवण करू शकतात. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करते. हे घेतल्याने पोट देखील भरलेले राहते आणि जास्त भूक लागत नाही.

मन शांत होते..
लाल केळीचे सेवन केल्यास मन शांत होते. त्यात सापडलेला ट्रायटोफन मनाला शांत करतो आणि आपली बुद्धिमत्ता वाढवते. त्याच्या सेवनामुळे, उन्हाळ्यामुळे पोटात होणारी जळजळ देखील कमी होते. तरी प्रत्येकाने एकद याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com