वर्कआउटनंतर कपडे चेंज केले नाही तर त्वचेवर होऊ शकतो साईडइफेक्टस

skin problem
skin problem
Updated on

आपण सर्वजण निरोगी राहण्यासाठी हेल्दी फूडपासून ते वर्कआउटसुद्धा करत असतो. हे स्वत: ला अधिक अक्टिव्ह ठेवण्यात मदत करतात. आजकाल प्रत्येकजण आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी वर्कआउट करत आहे. वर्कआउटचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. खरं तर जेव्हा वर्कआउट करतो तेव्हा खूप घाम येतो आणि बर्‍याचदा वर्कआऊटनंतर घाम कोरडे होण्याची वाट पाहतो आणि मग कपडे बदलतो. बर्‍याच वेळा जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा वर्कआउटनंतर आपण एखाद्या कामात व्यस्त होतो, ज्यामुळे बर्‍याच वेळेसाठी तेच कपडे अंगावर ठेवतो. परंतु असे करणे त्वचेसाठी अजिबात चांगले नाही. यामुळे त्वचेत बरेच बदल होऊ शकतात. 

शरीरामधून दुर्गंधी येते  
जेव्हा तुम्ही वर्कआउट करताना घाम येतो आणि त्याच घामाच्या कपड्यांमध्ये राहिले तर ते घामामुळे येणारी दुर्गंधी शरीराबाहेर पडणे अवघड होऊन बसते.  वर्कआउट केल्यानंतर आपण बॅक्टेरियांना आवडत्या दोन गोष्टी देतो ते म्हणजे ओलावा आणि उष्णता. तर जीवाणू तुमच्या अंडरआर्म्स आणि बाकीच्या जागेवर बॅक्टेरिया वाढतात आणि ते लगेच साफ न केल्यास शरीरामधून दुर्गंधी येऊ शकते.

रॅशेज येणे 
ओलावा आणि उष्णतेमुळे बॅक्टेरिया होऊ लागतात. हे बुरशीचे (फंगस) आणि (जर्म्स) जंतूंसाठी तितकेच योग्य आहे. अशा परिस्थितीत वर्कआउटनंतर लगेच कपडे बदलले नाही तर  तुम्ही ते वाढण्यासाठी प्रोत्साहन देत आहात. याशिवाय वर्कआउट्ससाठी योग्य कपडे निवडले पाहिजे. (उदा. योगा आणि पायलेटसाठी स्ट्रेचेबल कपडे घाला आणि अन्यथा अन्य वर्कआउटसाठी सैल आणि आरामदायक कपडे घाला.)

मुरुम होण्याची शक्यता
तुमच्या चेहऱ्यावर, पाठीवर मुरुमांचा सामना करण्यासाठी ही सोपी गोष्ट नाही. अशा परिस्थितीत तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की, कोणत्याही चुकीमुळे अडचण येऊ नये. उदा. वर्कआउटवेळी तुम्ही कोणाबरोबर टॉवेल्स शेयर करणे टाळा. तसेच वापरल्यानंतर टॉवेल्स बदला आणि वापरण्यापूर्वी धुवा आणि वाळवा. 

स्किनवर स्क्रॅचेस येणे
आपल्याला हे ऐकण्यास विचित्र वाटेल, परंतु जर तुम्ही वर्कआउटनंतर घामाच्या कपड्यांमध्ये असाल तर स्किन सोलली जाण्याची भीती देखील असू शकते.  व बॅक्टेरियामुळे तुम्हाला त्वचेवर खाज सुटणे आणि अशा परिस्थितीत जेव्हा त्वचेवर स्क्रॅच येतात तेव्हा त्वचेवर लालसरपणा आणि तीव्र जळजळ होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर यामुळे काहीवेळा स्किनची सालही निघते. 
उदा. जेव्हा तुम्ही धावता तेव्हा मांडी एकत्र घासल्या जातात आणि नंतर ओल्या कपड्यांमध्ये राहिल्यास एक विचित्र खाज येते. असेच स्तनांमध्ये आणि आपल्या  हाताखाली घडते. म्हणून वर्कआउट करताना आरामदायक कपडे घाला आणि लवकरात लवकर कपडे चेंज करा


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com