esakal | #periods: स्वच्छतेला द्या प्राधान्य; मासिक पाळीच्या काळात घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

#periods: स्वच्छतेला द्या प्राधान्य; मासिक पाळीच्या काळात घ्या काळजी

आजकाल केवळ १२ ते १३ वर्षांच्या मुलींनादेखील पाळी येत असल्याचं पाहायला मिळतं.

#periods: स्वच्छतेला द्या प्राधान्य; मासिक पाळीच्या काळात घ्या काळजी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मासिक पाळी.  स्त्रियांना पाळी येणं आणि ती नियमित असणं हे स्त्रियांच्या आरोग्याचं खास लक्षण आहे. विशेष म्हणजे मासिक पाळी आली म्हणजे मुलगी वयात आली असं म्हटलं जातं. परंतु, आजकाल केवळ १२ ते १३ वर्षांच्या मुलींनादेखील पाळी येत असल्याचं पाहायला मिळतं. इतक्या कमी वयात मुलींना या सगळ्या गोष्टींना समोरं जावं लागतं त्यामुळे अनेकदा त्यांना मासिक पाळी म्हणजे काय, या दिवसांमध्ये  स्वत:ची काळजी किंवा स्वच्छता कशी राखायची हेदेखील मुलींना समजत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये कोणती खबरदारी आणि स्वच्छता बाळगायची ते जाणून घेऊयात.

मासिक पाळीच्या काळात वापरण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, त्यांचा योग्य वापर कसा करावा. हे जाणून घेणं गरजेचं आहे. तसंच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही हेदेखील आपल्याला माहित असावं.

१. आजही अनेक स्त्रिया किंवा तरुणी मासिक पाळीच्या काळात कॉटनचे कापड किंवा अन्य कपड्यांच्या घड्या वापरतात. परंतु, अशा पद्धतीचं कापड वापरत असतांना त्याची स्वच्छता करणं गरजेचं आहे. हे कापड वापरल्यानंतर गरम पाण्यात स्वच्छ धुवून ते कडक उन्हात वाळवावं.

हेही वाचा : #PCOS : चेहऱ्यावर पुरळ येतंय?  जाणून घ्या पीसीओएसची लक्षणं

२. सॅनेटरी पॅड दर चार तासाने बदलणं गरजेचं आहे. एकच पॅड बराच वेळ वापरल्यास इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

३. अनेक तरुणी टॅम्पॉनचा वापर करतात. परंतु, हे टॅम्पॉनदेखील दर तीन तासाने बदलणं गरजेचं आहे.

४. सध्याच्या काळात मेनस्ट्रॉल कपकडे पर्यावरणपूरक वस्तू म्हणून पाहिलं जात आहे. मासिक पाळीच्या काळात हा कप वापरल्यानंतर तो फेकून न देता स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतो. परंतु, हा कप तुम्ही जास्तीत जास्त २ वर्षांपर्यंत वापरु शकता.

( डॉ. अंशुमाला शुक्ला- कुलकर्णी या मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात गायनकोलॉजिकल लैप्रोस्कोपिक सर्जन,कन्सल्टंट आहेत.)
 

loading image
go to top