बॉलिवूडमध्ये सर्वात नावाजलेला गांजा, मारिजुआना हे नेमकं काय आहे? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडमध्ये सर्वात नावाजलेला गांजा, मारिजुआना हे नेमकं काय आहे? जाणून घ्या सविस्तर

मुंबईः मारिजुआना, हा शब्द कुणी  ऐकला नसेल असा कदाचितच कुणी सापडेल. हा शब्द जरी एखाद्याने ऐकला नसला तरीही याची इतर काही नावं देखील सर्वज्ञात आहेत. याला विड, पॉट, डोप, गांजा अशा विविध नावांनी ओळखलं जातं. कॅनाबिज झाडाची सुकलेली पाने आणि फुले म्हणजे मारिजुआना. यामध्ये ट्रायहायड्रोकॅनाबिनॉल सारखी मानसिक स्थिती बदलणारी सायकोऍक्टिव्ह संयुगे आढळून येतात. मात्र यामध्ये अशीही काही सक्रिय संयुगे आहेत ज्यामुळे आपली मानसिक स्थिती बदलत नाही. मुख्यत्त्वे यामध्ये कॅनाबिडीओल किंवा सीबीडी या सारखेही घटक आढळतात. 

जाणून घेऊयात गांजाबद्दलची अत्यंत महत्वपूर्ण माहिती 

१. मारिजुआना कसा वापरला जातो?

गांजा वापरण्याचे बरेच मार्ग आहेत आणि गांजा प्रत्येक वापरकर्त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावित करतो. गांजा रोल करून म्हणजे एका कागदात वळून सिगारेटसारखा ओढला जातो किंवा सिगारमधूनदेखील गांजा ओढण्याची पद्धत आहे. याशिवाय पाइपमधून ओढून, जेवणामध्ये किंवा काही वेळेस चहामध्ये उकळून विविध पद्धतीने वापरला जातो. गांजतील तेल काढून, त्यातील अर्क काढूनही गांजाचा वापर केला जातो. ज्या व्यक्ती अशा पद्धतीने गांजाचा वापर करतात त्यांना 'डबिंग' म्हटलं जातं. 

२. कशावरून ठरतं की गांजा एखाद्या व्यक्तीवर कसा प्रभाव पाडतो ?

इतर कोणत्याही औषधाप्रमाणेच एखाद्या व्यक्तीवर गांजाचा पडणारा प्रभाव अनेक घटकांवर अवलंबून असतो. यामध्ये त्या व्यक्तीचा त्या औषधांवरील मागील अनुभव काय सांगतो यावर गांजाचा प्रभाव कसा असेल हे अवलंबून आहे. ज्यामध्ये जीवशास्त्र (उदा. जनुक), लिंग, औषधं कशी घेतली जातात आणि ती किती  मजबूत आहे याचा समावेश आहे. 

३. गांजा / मारिजुआना औषध आहे?

गांजा / मारिजुआना वनस्पतीमध्ये काही अशी रसायने आहेत, ज्यामुळे आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. अनेक देशांनी गांजाला काही विशिष्ट परिस्थितींसाठी एक औषधी वनस्पती म्हणून त्यांचा वापर कायदेशीर ठरवलाय. मात्र गांजाची वनस्पती एक औषधी वनस्पती आहे, हे सिद्ध करणारं पुरेसं संशोधन झालेलं नाही. तसेच, अमेरिकेतील US FDA फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन ने गांजाच्या वनस्पतीस औषध म्हणून मान्यता दिलेली नाही. 

४. गांजा बहुतेक वेळा धूम्रपानातून ओढला जातो. असं केल्याने गांजा आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयातील रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला नुकसान पोहोचवू शकतो. हे आणि यासारखं नुकसान मेंदू आणि शरीरावर हानिकारक परिणाम दर्शवते, म्हणून गांजा हा शरीरासाठी अधिक हानिकारक ठरतो. गांजाची औषध म्हणून ठोस स्पष्टता न होण्याचं कारण म्हणजे, या वनस्पतीत आणि रोपामध्ये आढळून येणारे काही विशिष्ट घटक अगदी एकसारखे नसतात. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारचे आणि किती केमिकल्स यातून मिळवत आहोत हे जाणून घेण्याचे कोणतेही मार्ग नाही. 

गांजतील 'टीएचसी'सारख्या केमिकलपासून दोन प्रकारच्या गोळ्या बनविल्या गेल्या आहेत. गांजाच्या वनस्पतीमध्ये सापडलेल्या रसायनांपैकी एक म्हणजे म्हणजे ज्यामुळे लोकांना “हाय" (किक बसणे) वाटतं. सोबतच जर एखाद्याला कर्करोग असेल तर ही दोन औषधे नॉरशिया (मळमळ) दूर करु शकतात. यासोबतच एड्स असल्यास अनेकांना भूक लागत नाही किंवा खाण्याची इच्छा नसते. अशात यांचा प्रभावी वापर होऊ शकतो. मात्र ही औषधे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रसायनाचा मेंदूवरही परिणाम होतो, म्हणून या गोळ्या केवळ औषध म्हणून काम करण्याव्यतिरिक्त आपल्या शरीरावर देखील परिणाम करू शकतात. या सोबतच गांजतील कॅनाबिडीओल (CBD) वर देखील संशोधन सुरु आहे. या रसायनामुळे किक लागण्याचा प्रकार होत नाही. यावर अजून संशोधन सुरू आहे.

५. एखाद्याला गांजाचे व्यसन लागणे शक्य आहे काय?

होय, 10 व्यक्तींपैकी १ गांजाचं सेवन करणाऱ्या व्यक्तीला गांजाच व्यसन जडतं. जे लोक 18 वर्षांपेक्षा कमी वयात गांजा सेवन सुरु करतात त्यांच्यासाठी ही ती संख्या अधिक आहे. 

६. मला गांजाचे व्यसन लागलेले आहे हे मला कसे कळेल?

एखाद्याला गांजाचं व्यसन लागण्याची ही आहेत चिन्हे 
गांजाचं सेवन करणं टाळता न येणे. 
आपल्या कुटुंबातील किंवा मित्रांसोबतचे महत्त्वाचे क्षण गांजा साठी व्य अघालवके 
यामुळे घरात, शाळांमध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी अडचणी येत आहेत हे ठाऊक असूनही गांजाचे सेवन सुरूच ठेवणे. 
कधीतरी गांजाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती आणि सातत्याने गांजाचं सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये सातत्याने गांजाचं सेवन करणाऱ्या व्यक्तींना जास्त धोका आहे. 

७. गांजा वापरण्याचे आरोग्यविषयक धोके काय आहेत?

गांजाचं व्यसन जडणे 
मेंदूचं आरोग्य धोक्यात येणे 
कॅन्सर होणे 
तीव्र वेदना होणे 
हृदयाचे आरोग्य धोक्यात येणे 
मानसिक आरोग्य बिघडणे

Most talked about Bollywood marijuana important information about Hemp

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com